संघर्षातून माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात ः डॉ. घुले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 16, 2021

संघर्षातून माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात ः डॉ. घुले

 संघर्षातून माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात ः डॉ. घुले

विविध क्षेत्रातील मान्यवराचा सन्मान करण्यात आला


नगरी दवंडी/प्रतिनिधी
माका ः  अच्छे दिनाचे स्वप्न दाखवणार्‍यापैकी आम्ही नाहीत. स्वप्न दाखवणार्‍या नेत्याची अनेक गर्दी सध्या पहावयास मिळते. मला माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांच्या बोलेले तेच काम करण्याची शिकवण मी घेतली आहे. त्या शिकवणी नुसार माझे काम चालु आहे. गारपीठ, अतिवृष्ठी किंवा शेतकर्‍यांच्या पीक विम्याचा प्रश्न असो मी नेहमीच न्याय देण्याचे काम केले आहे. त्यासाठी मी आनेक वेळा संघर्षही केला आहे. यंदा मुळा धरण भरल्याची गोड बातमी आपल्या देताना आनंद होत आहे कि आपल्याला पाण्यासाठी या वर्षी संघर्षाची वेळ येणार नाही. गेल्या काही वर्षापुर्वी भातकुडगाव फाटा येथील दुध दरवाढी साठी झालेल्या दुध परिषदेपासुन माझ्या राजकिय जीवनाची सुरुवात झाली. असे मत शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांनी व्यक्त केले.
शेवगाव तालुक्यातील भायगाव येथे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षरोपना नंतर नवनाथ बाबा मंदिराच्या सभागृहात विविध क्षेत्रातील उल्लेख काम करणार्‍या व्यक्तीना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यामध्ये विठ्ठल प्रल्हाद आढाव (कोरोना योद्धा विशेष पुरस्कार ) अ‍ॅड. लक्ष्मणराव लांडे ( सामाजीक कार्य गौरव ) जनार्दन लांडे ( सामाजीक कार्य गौरव ) दिगंबर शिलेदार ( जुन्या पिढीतील शिक्षक ) कल्याण आढाव( सहकारातील उत्कृष्ट कार्य ) सागर चव्हाण ( समाजकार्य गौरव ) अनिल मडके (तीसर्‍या पिढीतील एकनिष्ठ कार्यकर्त )अशोक मेरड (तीसर्‍या पिढीतील एकनिष्ठ कार्यकर्त ),प्रदिप मगर ( महसुल खात्यामध्ये ऊकृष्ट सेवा ) ह.भ.प. प्रतिभाताई शेळके ( समाजप्रबोधनकार ) बाळासाहेब काळे ( शेतकरी आंदोलनात सहभाग ) एस.ए.चव्हाण (कृषी साहाय्यक ) अशोक दुकळे ( तंटामुक्त अभियानात विशेष सहभाग ) कडुबाळ दुकळे ( प्रगतशिल शेतकरी ) राजेश फटांगरे ( दुग्ध व्यवसायातील उष्कृष्ट मार्गदर्शन ) रोहिणीताई साबळे (आदर्श शिक्षक ) यांना शेवगाव पंचायात समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील, शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिलराव मडके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष संजय कोळगे, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ साळवे, कामधेनु पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब काळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी संजय कोळगे, अ‍ॅड लक्ष्मणराव लांडे, हरिभाऊ दुकळे, विठ्ठल आढाव, अ‍ॅड.सागर चव्हाण, अनिल लांडे यांची भाषणे झाली.
यावेळी भायगावचे सरपंच हरिभाऊ दुकळे, माजी सरपंच अशोकराव दुकळे, रामनाथ आढाव, संजय लांडे, विकास सेवा संस्थेचे व्हा चेअरमन किसन शेकडे, ह.भ.प. हरिभाऊ महाराज अकोलकर, भगवान आढाव, आण्णासाहेब दुकळे, रामभाऊ मेरड, हरिचंद्र आढाव, शिवाजी लांडे, विष्णु आढाव, ज्ञानदेव नेव्हल, संतोष आढाव, माणिक शेकडे, विष्णुआढाव, बाळासाहेब लोढे, डॉ. दुकळे, डॉ. रघुनाथ आढाव, पाडुरंग दुकळे, राजेंद्र दुकळे, पांडुरंग आढाव,पोपट लोखंडे, अभिजीत आढाव, बाबासाहेब शिलेदार, मुक्ताजी आढाव,पाडुरंग नेव्हल, कडुबाळ आढाव, गणेश शेळके, आण्णासाहेब जर्‍हाड, मुक्तार शेख,दत्तु आगळे, ज्ञानेश्वर लोखंडे, अक्षय घुले, विजय दुकळे,संभाजी कडुस, आजीनाथ लांडे, मधुकर सौदागर, गंगा डमाळे, प्रसाद सौदागर, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक पत्रकार शहाराम आगळे यांनी केले. तर आभार कल्याण आढाव यांनी मानले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नंदू शेळके यांनी केले.

No comments:

Post a Comment