गाजरे, वरखडे, कवाद यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने राष्ट्रवादी बळकट होणार ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 16, 2021

गाजरे, वरखडे, कवाद यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने राष्ट्रवादी बळकट होणार !

 गाजरे, वरखडे, कवाद यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने राष्ट्रवादी बळकट होणार !

गेली दोन वर्षात आमदार निलेश लंके यांनी निघोज आळकुटी जिल्हा परिषद गटात सर्वाधीक विकासकामे केली आहेत, दोन दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात निघोज येथील एक कोटी रुपयांच्या निधीची तरतूद असलेली अभ्यासिका तसेच निघोज अंतर्गत पन्नास लाख रुपयांची रस्ते चोंभुत परिसरातील एक कोटी रुपयांच्या निधीची तरतूद असणारा रस्ता, विज,पाणी, आरोग्य यासारखे प्रश्न त्यांनी सोडवीले आहेत, निघोज सारख्या मोठ्या लोकवस्तीच्या गावातील सत्ता वराळ गटाकडे असूनही ग्रामपंचायतने पाठपुरावा केलेली कामे आमदार निलेश लंके यांनी तातडीने मार्गी लावली असून राजकारण नको तर समाजकारणातून गाव व परिसराचा विकास झाला पाहिजे हा संदेश आमदार लंके यांनी दिला असल्याने निघोज आळकुटी जिल्हा परिषद गट आणखीन प्रबळ होत असून या गटातील राष्ट्रवादी पक्षाची ताकद आणखीनच वाढली असल्याने विकासात्मक बाबीत हा गट येत्या चार दोन वर्षात आणखीनच भक्कम होणार आहे.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः  आमदार निलेश लंके यांनी एकीकडे विकासकामांचा धमाका सुरू केला असून विरोधकांना मोठ्या प्रमाणात चपराक देण्यासाठी जून्या जाणत्या कार्यकर्त्यांनराष्ट्रवादी पक्षात प्रवेश देण्याचे तंत्र सुरू केले असून याचाच एक भाग म्हणून निघोज येथील विकासकामांच्या कार्यक्रमात शिवसेनेचे नेते रमेश वरखडे,तारांचंद गाजरे यांना राष्ट्रवादी पक्षात घेऊन पक्षसंघटना बळकट करण्याचे धोरण घेतले आहे, यामध्ये काही काळ म्हणजे विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या प्रचारार्थ सक्रिय राहिलेल्या व पुर्वाश्रमीच्या राष्ट्रवादी महिला आघाडीच्या माजी तालुकाध्यक्षा सुधामती कवाद याही स्वगृही परतल्या आहेत.
राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या गाजरे,कवाद,वरखडे यांना पक्षप्रवेश देउन आमदार निलेश लंके व त्यांच्या सहकार्‍यांनी पक्षीय राजकारणावर चांगलीच पकड मिळवली आहे,तारांचंद गाजरे हे देवीभोयरे येथील असून गेली दहा ते बारा वर्षांपासून ते शिवसेनेत कार्यरत असले तरी आमदार निलेश लंके यांचे ते जवळचे कार्यकर्ते असल्याने गाजरे लंके यांची विचारधारा एकच आहे,शिवसेनेतील युवा नेतृत्व म्हणून गाजरे यांचा बोलबाला असून शिवसेना पक्ष वाढीसाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले होते,मात्र निलेश लंके यांच्या विचाराशी जवळीक ठेउन काम करणार्‍या गाजरे यांना राष्ट्रवादी हा पक्ष जवळचा वाटू लागल्याने त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करीत आमदार निलेश लंके यांना पाठबळ देण्याचा निर्णय घेत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे, रमेश वरखडे यांना साडेचार वर्षांपूर्वी झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेने पंचायत समीतीची उमेदवारी दिली होती, मात्र पक्षश्रेष्ठींनी फक्त उमेदवारी दिली निवडणुकीत म्हणावे तसे पाठबळ दिले नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत आमदार निलेश लंके यांनी गेली दोन वर्षात मतदार संघाचा विकासाभिमुख चेहरा बदलला असून राष्ट्रवादी हा पक्ष भविष्यातही चांगल्या प्रकारे काम करणारा असल्याने व आपल्याला खर्‍या अर्थाने आमदार निलेश लंके हेच न्याय देतील या अपेक्षेने गाजरे,कवाद व वरखडे यांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार निलेश लंके यांच्या कार्यक्षमतेने निघोज आळकुटी जिल्हा परिषद गटात आणखीनच मजबूत झाला आहे, त्यातच विकासकामांच्या माध्यमातून निघोज आळकुटी जिल्हा परिषद गटातील निघोज ग्रामपंचात महत्वपूर्ण सत्ता असलेल्या संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांचाही कल आमदार निलेश लंके यांच्याबाजूने असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात व गटात खर्‍या अर्थाने आमदार निलेश लंके म्हणजेच राष्ट्रवादी पक्षाने वलय तयार केले असून जिल्हा परिषद गटात व पंचायत समिती गणात होणारे विकासकामे राष्ट्रवादी पक्षाच्या पथ्यावर पडत असल्याने राष्ट्रवादी पक्षाला शह देण्यासाठी विरोधी पक्ष काय व्यूहरचना करतो याकडे जनतेचे लक्ष वेधले गेले आहे,कोरोना संसर्गामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक वर्षभर तरी पुढे जाण्याची शक्यता गृहीत धरून राष्ट्रवादी पक्षाची ताकद रोखण्यासाठी विरोधी पक्ष काय करणार आहे याकडे जनतेचे लक्ष वेधले गेले आहे.

No comments:

Post a Comment