मनापासून केलेले काम मनस्वी आनंद देते ः प्रा.साबळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 16, 2021

मनापासून केलेले काम मनस्वी आनंद देते ः प्रा.साबळे

 मनापासून केलेले काम मनस्वी आनंद देते ः प्रा.साबळे

नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः  अरणगाव येथील श्री अरण्येश्वर विद्यालयात माजी प्राचार्य महादेव साबळे सर आणि रयत सेवक हिराचंद आष्टेकर यांचा सेवापूर्ती शुभेच्छा समारंभ विद्यालयात संपन्न झाला.प्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य रमेश वराट सर,पर्यवेक्षक हरिभाऊ कोल्हे सर,प्रमुख पाहूणे व सत्कारमूर्तींनी सपत्नीक कर्मवीर भाऊराव पाटील आणि लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतीमांचे पुजन केले.
प्रास्ताविकात प्राचार्य वराट सरांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करुन सत्कारमूर्तींना दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.दिपक तुपेरे सरांनी सत्कारमूर्तींचा परिचय करुन दिला व  विद्यालयातर्फे प्राचार्य, पर्यवेक्षक व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दोन्ही सत्कारमूर्तींचा सपत्नीक
सत्कार केला.रयत शिक्षण संस्थेच्या दासखेडचे प्राचार्य फाळके सर,सोलापूरचे प्राचार्य ढवळे सर,अंमळनेरचे प्राचार्य गुळवे सर,जामखेड कन्या विद्यालयाचे वारे सर,यादव सर ,भोंडवे सर हे प्रमुख पाहूणे कार्यक्रमासाठी उपस्थित होते या पाहूण्यांचे विद्यालयातर्फे स्वागत केले व या पाहूण्यांनीही सत्कारमूर्तींचा सपत्नीक सत्कार केला.

विद्यालयाचे शिक्षक सर्वश्री आडे,करपे,शेळके, गंधे,चांगुणे यांनी मनोगत व्यक्त केले.विद्यालयाचे सेवानिवृत्त सेवक व अरण्येश्वर विद्यालयाला पाच एकर जमीन देणारे हिरा आष्टेकर यांनी विद्यालयाचे आभार व्यक्त केले,तर माजी प्राचार्य महादेव साबळे यांनी सत्काराला उत्तर देताना आपण या विद्यालयात मनापासून काम केले,त्यामुळे फार मोठे समाधान मिळाले.  विद्यार्थी, शिक्षक, स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले.शेवटी विद्यालयाचे पर्यवेक्षक कोल्हे सरांनी उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाचा समारोप केला.

No comments:

Post a Comment