अवैध गावठी हातभट्टी दारू अड्डे उध्वस्त. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, September 10, 2021

अवैध गावठी हातभट्टी दारू अड्डे उध्वस्त.

 अवैध गावठी हातभट्टी दारू अड्डे उध्वस्त.

डीवायएसपी संदीप मिटके व त्यांचे पथकाची कारवाई.
1,40,000/-चा मुद्देमाल जप्त, हरेगाव मधील 4 आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल.


श्रीरामपूर -
श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव आऊटसाईड परिसरातील गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर डीवायएसपी संदीप मिटके यांचे आदेशाने श्रीरामपूर पोलिसांनी छापा टाकून गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे रसायन व दारू याचा नाश करुन 4 आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी. अशोक बाबुराव गायकवाड यांचेकडील 42,000/-  रु. कि.चे 600 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन (किं.अं.) 3500/- रू किमतीची 35 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची किं. अं.), आरोपी. सुधीर काशिनाथ गायकवाड यांचेकडील 38,500/-  रु. कि.चे 550 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन (किं.अं.) 2000/- रू  किमतीची 20 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू (आंबट उग्र वासाची (किं.  अं.), आरोपी. अशोक रामभाऊ गायकवाड यांचेकडील 35,000/- रु. कि.चे 500 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन (किं. अं.) 3500/- रू  किमतीची 35 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू (आंबट उग्र वासाची किं. अं.), आरोपी. संतोष चंद्रभान गायकवाड यांचेकडील 14,00/-  रु. कि.चे 200 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन (किं.अं.) 1,500/- रू  किमतीची 15  लिटर तयार गावठी हातभट्टी दारू (आंबट उग्र वासाची (किं. अं.) एकूण 1,40,000/-/-  रुपये चा मुद्देमाल ताब्यात घेऊन जप्त केला आहे.
सर्व आरोपींविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे, मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 (फ) (क) (ड)  (ई)  प्रमाणे  गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अचानक झालेल्या व लागोपाठ सुरू असलेल्या कारवाईमुळे हरेगाव आऊटसाईड परिसरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले असून सदर कारवाई चे हरेगाव येथील महिलांनी  पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके व त्यांचे पथकाचे कौतुक  करून आभार व्यक्त केले. ही कारवाई मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे,  यांचे मार्गदर्शनाखाली  पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, राजेंद्र आरोळे, सुरेश औटी, पो. कॉ. नितीन शिरसाठ, लक्ष्मण  राऊत, अमोल गायकवाड, प्रवीण भोजे, आर सी पी पथक आदींनी केली.

No comments:

Post a Comment