जिल्ह्यातील 3 वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, September 10, 2021

जिल्ह्यातील 3 वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या.

 जिल्ह्यातील 3 वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर शहर पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपाधिक्षक प्रांजली सोनवणे श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे या जिल्ह्यातील तीन वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात आल्या आहेत.श्रीरामपूर येथील अपर पोलिस अधीक्षक दिपाली काळे यांची महाराष्ट्र पोलिस अकादमी (नाशिक) येथे पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. तर त्यांच्या जागेवर आंबेजोगाई येथून स्वाती रामराव भोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगर शहराचे उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांची औरंगाबाद शहर येथे सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून बदली झाली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपअधीक्षक प्रांजली सोनवणे यांची सोलापूर शहर येथे सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून बदली झाली आहे. तर पिंपरी-चिंचवड येथील सहाय्यक पोलिस आयुक्त संजय नाईक-पाटील यांची नगर पोलिस मुख्यालयात उपअधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.


No comments:

Post a Comment