पालकमंत्र्यांच्या सूचनांवरून अतिवृष्टी भागांची, केली पाहणी, पालकमंत्र्यांचे जिल्ह्यावर लक्ष. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, September 13, 2021

पालकमंत्र्यांच्या सूचनांवरून अतिवृष्टी भागांची, केली पाहणी, पालकमंत्र्यांचे जिल्ह्यावर लक्ष.

 पालकमंत्र्यांच्या सूचनांवरून अतिवृष्टी भागांची, केली पाहणी, पालकमंत्र्यांचे जिल्ह्यावर लक्ष.

राज्यमंत्री तनपुरेंनी घेतली अतिवृष्टीतील नुकसानीची आढावा बैठक.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर जिल्ह्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांनी मला अतिवृष्टी झालेल्या भागांचा पाहणी दौरा करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार मी त्या भागांचे पाहणी दौरे केले होते. पालकमंत्र्यांचे जिल्ह्यावर पूर्ण लक्ष आहे. ते जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत. आगामी शुक्रवारी व शनिवारी ते जिल्हा दौर्‍यावर येणार असल्याची माहिती ग्रामविकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे.
राज्याचे ग्रामविकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्ह्यातील पाथर्डी शेवगाव नगर या तीन अतिवृष्टीत झालेल्या तालुक्यांत नुकसानीची आढावा बैठक घेतली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ना.तनपुरे म्हणाले की, पालकमंत्र्यांनी प्रशासन गतिमान ठेवले आहे. त्यांच्या सूचने नुसार दौरा करताना मी परिस्थितीची पाहणी केली. त्यावेळी केंद्राच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या धोरणानुसार निधी मिळवून देण्यासाठीच्या सूचना मी अधिकार्‍यांना दिल्या होत्या. कृषी व महसूल अधिकार्‍यांना नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या पिकाचे पंचनामे करून त्या संदर्भातील अर्ज शेतकर्‍यांकडून तातडीने भरून घेण्यास सांगितले होते. त्यामुळे 15 हजार शेतकर्‍यांकडून अर्ज भरून घेतले आहेत. त्यांना केंद्राच्या आपत्ती व्यवस्थापनानुसार मिळणार्‍या निधी पेक्षाही जास्त निधी मिळावा यासाठी राज्य सरकार प्रयत्नरत आहे.या सुमारे एक हजार आपत्तीग्रस्तांना प्रत्येकी तातडीने 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ वाटत करण्यात आले. जनावरे, विहिरी, पिके यांचे मोठे नुकसान झाले आहे. महावितरणाचे विजेचे खांबही कोसळले आहे. यातील काही खांब दलदलीत आहेत. ते सोडून इतर खांब तातडीने बसवून वीज प्रवाह सुरळीत करण्याच्या सूचना महावितरण प्रशासनाला दिल्या होत्या. यात तीन चार ठिकाणी हलगर्जीपणा आढळून आला. संबंधित अधिकार्‍यांना तातडीने काम न झाल्यास कारवाई करण्यात येईल असे बजावले आहे. या पूर्वी श्रीरामपूर तालुक्यात असेच हलगर्जीपणाचे काम आढळून आले होते. तेथे संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई केली होती, असे प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.
या बैठकीला आमदार मोनिका राजळे, शेवगाव पंचायत समितीचे सभापती क्षितिज घुले, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील काकडे, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here