लोकप्रतिनिधींच्या तालावर , नाचता येत नाही. त्यांनी... थुंकलेले मला चाटता येत नाही. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 20, 2021

लोकप्रतिनिधींच्या तालावर , नाचता येत नाही. त्यांनी... थुंकलेले मला चाटता येत नाही.

 लोकप्रतिनिधींच्या तालावर , नाचता येत नाही. त्यांनी... थुंकलेले मला चाटता येत नाही.

पारनेर तहसीलदारांच्या ऑडिओ क्लिप ने उडाली खळबळ.

तो लोकप्रतिनिधी कोण? चर्चेला उधान.
  “मला एक व्हिडिओ दिसू लागला... मला लोकप्रतिनिधींनी अजिबात मारले नाही. उलटे मला छान वागणूक देऊन या गावाहून त्या गावाला फिरवत आहेत. मला मारले नाही... हाच तो व्हिडिओ... तीच भिंत, तीच जागा, कोंडून व्हिडिओ घेण्याची... रंग काही उजळलेला होता इतकंच. असाच एक फक्त पोलिसांनी नेहमीप्रमाणे पाहिलेला व्हिडीओ मला आठवला. तो व्हिडिओ ज्या पाटलांनी केला. त्यांना लोकप्रतिनिधींनी स्वतःजवळ बसवून फिरवलं. गोडधोड खाऊ घातलं, जमेल तशी रुचकर दारूसुद्धा पाजली... कारण तो एकच पाटील म्हणत असेल.. उंदरे, तू बाई आहेस आणि मी पुरुष आहे बघ.... पाटलाचा व्हिडिओ पाहून मी स्वतःला गालात मारुन घेतलं. जसं मागे माझ्या ड्रायव्हरला कोंडून ’तहसीलदार बाईंनी मला मारलं’ असा कोंडून व्हिडिओ बनवला होता. तसा हा मला मारले नाही हा व्हिडीओ. तीच भिंत.. तीच जागा..एका कोविड सेंटरच्या एक्स-रे रूम मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्यासमोर एका जिल्ह्याचा अधिकार्‍याला व लीपिकाला ’जेसीबी आणि ट्रक का पकडला?’ असं म्हणून लाथाने बदडून बदडून लोकप्रतिनिधींनी मारले. आणि त्यानंतर त्यांना मटण खाऊ घातलं. कसा गिळला असेल मटणाचा तुकडा त्या अधिकाराच्या घशाखाली? हा गेला असेल कारण त्याचा जबडा पुरुषाचा होता. बाईचा घसाही लहान आणि आवाज छोटा. ताकद हे कमी आणि डोकं तर नाहीच. बाया सगळ्या डोक्यावर पडलेल्या... म्हणून बायांची पोस्टिंग करू नका यासाठी काही जण खास मंत्रालयात जातात फिल्डिंग लावायला.असो... बाईने बाईपण मान्य करायला हव.. नाहीतर तयारी ठेवायची सुसाईड नोट ड्रॉवरमध्ये ठेवून काम करण्याची.. खुपच लांबली सुसाईड नोट... ठरवूनही कोणाचं नाव नाही घेऊ शकले मी. कारण पुरुष असले तरी स्रियांचे नवरे, भाऊ, सासरे, दीर आहेतच की ते सगळे... ते सगळे आत गेले तर माझ्या अनेक सख्यांचे संसार उद्ध्वस्त होतील. त्यापेक्षा नकोच हे पाप. ज्यांनी त्रास दिला ते मात्र मनातून समजून जातील. पण हो अजिबात दाखवणार नाही ते... कारण ते पुरुष आहेत. त्यांना स्त्रियांसारखा भळा भळा गळा काढता येत नाही त्यांना... त्यांना फक्त हळुच चीरता येतो गळा... जय हिंद. काळजी घ्या.”


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः “प्रिय दीपाली चव्हाण घाबरु नकोस मी लवकरच तुझ्या वाटेवर तुला सोबत करण्यासाठी येत आहे. त्याशिवाय दुसरा मार्गच दिसत नाही. तुझ्या वाटेवर दिसते एक आशेची उजळलेली पणती बाकी सारा अंधार दिव्याखालचा. खर तर तु या रस्त्यावरुन गेली तेव्हा मी सूसाईट नोट लिहून रडत कुढत जगणार्‍या सार्‍या मैत्रिणींना हक्कानं खडसावले होतं, फुलराणी बना तुला शिकवीन चांगला धडा असे पालुपद गा. मी पण तेच पालूपद गात होते. पण लक्षात आले त्याचे परिणाम. किती जणांना धडा शिकवायचा पण या चिमुकल्या पंख्यात आता त्राण राहिले नाही. तत्वांना मुरड घालून जगता येत नाही. त्यांची हुजरी करत तळवे चाटता येत नाही. लोकप्रतिनिधींच्या तालावर नाचता येत नाही, त्यांनी थूंकलेलं मला चाटत येत नाही. उकिरड्यावर उभ्या असलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या धिंडी मला रोखता येत नाही. अन् वरिष्ठांना सांगूनही त्यांना खिंडीत गाठता येत नाही. त्यांनी तर खिंडीत सहाय्य पोहचविण्याऐवजी मारेकरी पोहचविण्याचे काम केलं. ठिक आहे लोकप्रतिनिधी आणि आपण एकाच रथाची दोन चाक. पण आपल्या चाकांनी जरा गती घेतली की आपला घात निश्चित समजावा” पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या या आँडिओ क्लिपमुळे राज्यात खळबळ उडाली असून पारनेरच्या लोकप्रतिनिधीच्या व्यापाला कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी या क्लिपमध्ये दिला आहे. यात त्यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख हा तेथील लोकप्रतिनिधींवर असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आत्महत्या केलेल्या वनअधिकारी दीपाली चव्हाण यांना उद्देशून देवरे यांनी पत्र लिहिलं आहे. मी लवकरच तुझ्या सोबत येत असल्याचे सांगत महिला म्हणून प्रशासनात कसा छळ होतो. लोकप्रतिनिधी कसा त्रास देतात. आणि वरिष्ठ त्यांना कसे पाठिशी घालतात याचा उल्लेख त्यांनी केला आहे. कोवीड लसीकरणावरुन एका लोकप्रतिनिधीने एका आरोग्य कर्मचार्‍याला मारहाण केली होती. नंतर ती तक्रार मागे घेण्यात आली. याचा उल्लेखही देवरे यांनी कोणाचेे नाव न घेता केला आहे. आपल्या विरुद्ध विधीमंडळात प्रश्न मांडणे, दमदाटी करणे, मी मारहाण केल्याची तक्रार माझ्या गाडीच्या चालकाकडून लिहून घेणं, अँट्रोसिटीची तक्रार दाखल करण्याची धमकी देणे असे अनेक प्रकार घडल्याने देवरे यांनी क्लिपमध्ये नमूद केले आहे. आपल्या मुलांकडे पाहून आत्महत्या करण्याचे पाऊल उचलण्याचा विचार कधीकधी येतो. मात्र परिस्थिती हाताबाहेर गेल्याने हे पाऊल उचल्याचे देवरे यांनी म्हटलं आहे.
यापूर्वी पारनेर तालुक्यात झालेल्या आरोग्य विभागाच्या करोना लसीकरण गोंधळाच्या बातम्या आणि घडामोडी याबाबतही ऑडिओमध्ये काही दाखले देण्यात आलेले आहेत. हा ऑडीओ नेमका कोणत्या अधिकार्‍याचा आहे आणि कोणत्या लोकप्रतिनिधीबाबत त्यांनी यामध्ये उल्लेख केलेला आहे, कोणत्या पक्षाचे राजकीय कार्यकर्ते सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना जाणीवपूर्वक त्रास देत आहेत आणि असे किस्से घडवून आणून अडचणीत आणले जात आहे याचा स्पष्ट उल्लेख त्या ऑडीओ क्लिपमध्ये नाही. मात्र, लोकप्रतिनिधी आणि काही राजकीय कार्यकर्त्यांनी त्रास दिल्याने वन विभागाच्या अधिकारी दिपाली चव्हाण यांनी जशी आत्महत्या केली तशीच परिस्थिती असल्याचे त्यात म्हटलेले आहे. मणू संस्कृती आणि त्यात महिलांना होणार त्रास, याचा सध्या महिला प्रशासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांना होणारा त्रास असे अनेक उल्लेख यात ऑडीओमध्ये आहेत. मात्र, नेमका रोख कोणाकडे आहे हे यात स्पष्ट नाही. तहसीलदारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र फोन बंद असल्याने नेमकी ही क्लिप खरी की खोटी हाच संभ्रम आहे. त्यामुळे हा कोणाला बदनाम करण्याचा तर डाव नाही ना, अशीही चर्चा होत आहे.
क्लिपमधील काही महत्वाचे मुद्दे असे :-
किती जणांना धडा शिकवायचा? या चिमुकल्या पंखात आता तेवढे त्राण राहिलेले नाही. तत्वांना मुरड घालून जगता येत नाही आणि ’जी हुजूर’ म्हणून तळवे चाटता येत नाहीत... त्यांनी खिंडीत सहाय्य पोचवणे ऐवजी मारेकरी पोहोचवण्याचं काम केलं.
लोकप्रतिनिधी आणि आपण, एक रथ दोन चाक... आपल्या चाकाने गती घेतली तर आपला घात निश्चित समजावा. कारण मागे राहणे हेच मनूने शिकवलं. सगळे मनूचे अनुयायी. मग वाट कशी चालणार पुढे पुढे? दिडशहानी, आगाऊ, भ्रष्ट अशा विशेषणांच्या मखरात आपल्याला कोंबणार. नाक दाबून ठेवणार.. जोपर्यंत विनवणी करीत नाही तोपर्यंत आपल्याविरुद्ध उपोषणाला बसवणार.. जुन्या चुका उकरून काढायच्या, नाहीतर एलेक्यूचा धाक, आणि त्यापलीकडे जाऊन अ‍ॅट्रॉसिटीचा धाक..
उपोषण, एलेक्यू, मोर्चे, चौकशी समिती, वरिष्ठांना सांगून हवा तसा रिपोर्ट बनवून घेणे. एवढ्या मोठ्या जातात आपलं  दळन होत आहे. आपल्या एवढी ताकत कुठय? जात्यातून वर उसळी घ्यायला. खरंतर पद मोठं, तेवढ्या जबाबदारी अधिक. कधी एखादी जबाबदारी थोडीफार चुकूही शकते. पण महिलेला माफी नाही कारण अहिल्येला सुद्धा माफी नव्हती. तुझ्या मार्गावर निघण्यापूर्वी दिपाली (दीपाली चव्हाण) मी थोडी घाई करते, असं जरा वाटतं. मात्र मी कायद्याच्या वाटेनही जाऊन पाहिलं.
खंडणी मागणार्‍यांवर गुन्हा दाखल केला. मला जरा हायसं वाटलं. वाटलं की मला म्हणतील, ओ शेठ... तुम्ही नादच केलाय थेट. अशा थाटात सर्व अधिकारी वर्ग माझ जंगी स्वागत करतील. पण जे कॅमेरे बसवलेले असतात ना कोण रिस्क घेणार? शिवाय शेठ हे फक्त पुरुषाला म्हणतात... बायांना कुठे शेठ म्हणता येत? स्री असाल तर स्वतःला गाडून घ्यायला लागत. सर्व ध्येय आशाआकांक्षा खुंटीला टांगून ठेवावे लागतात. एक तर धेय्याच्या वाटेवरून चालताना अगणित वेळा रक्ताळलेले पाय होते.
 त्या म्हणाल्या की, आता धीर नाही राहिला पायातलं बळ संपत चाललंय. असं अर्धमेल गलितगात्र मन का दाखवायचं मुलांना? कुठवर आपण घाव सोसून त्यांना पंखांखाली सुरक्षित ठेवायचं? त्यापेक्षा होऊन जाऊदे लढाई एकदा... एकदा मी निघून गेले की ते पोरके होतील. पंख संपतील.. मग उठतील पेटून आणि घेतील सुड एकाएकाचा. पण जाऊ दे आपली स्वप्न आपणच पूर्ण करायची. का त्या चिमुकल्यांच्या अंगावर ओझ? ज्यांचा सुड घ्यायचाय त्यांचे नाव सुसाईड नोटमध्ये लिहून जाव म्हणते. पण ती सुसाईड नोट कोर्टाने खोटी ठरवली तर... मग हिरा बनसोडे सारखे फीर्याद कोणाकडे द्यायची? ..कोण आपला कसा गेम करेल म्हणून आपला नेम जरा झाकूनच वापरते मी. ज्योतीसारखं फार डेरिंग वागू नये म्हणतील. त्यापेक्षा ताटाखालचे मांजर होऊन राहावं..
पण नियतीला आता वेगळेच काही मान्य नाही. मला आता समोर दिसतात ते लोकप्रतिनिधी. मी दुकानदारांना कोविड व्हॅक्सीन का करून घेतलं म्हणून रात्री जाऊन तालुक्याच्या मेडिकल ऑफिसरच्या मॅडमला.. उंदरे मॅडमला त्यांनी विचारलं खोदून खोदून... तहसीलदार मोठा कि लोकप्रतिनिधी?  ती बिचारी माझ्यासारखी असहाय्य. ढसा-ढसा रडू लागली आणि समोर पोलिस विभागाला सांगितलं जातं..  ?? हीला लेडीज पोलीस बोला मारायला...  तिच्यासोबतच्या दुसर्‍या बाईला पण मारा. तिच्यावर हात सफाई करता आली नाही. मग हात साफ करून घेतला, लाथा-बुक्क्यांनी बदडून काढलं... ते तिच्या पाटील नावाच्या लिपिकाला. मग कुठे लोकप्रतिनिधींचा आत्मा शांत झाला. त्या बाईने रडत मला फोन केला... मी तिला काय वाचवणार? ती बाई.. मी बाई... मी फक्त तिला सल्ला दिला. बाई तू वरिष्ठांना सांग... मी मार्ग दिला, तिने फोन केला. पण वरिष्ठ बाई नव्हते.

आरोग्य अधिकारी-कर्मचार्‍यांवर येथे प्रशासकीय व राजकीय दबाव आल्याचे पारनेर मधील प्रकरण शांत झाल्याचे उदाहरण ताजे असतानाच आता आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. महसूल विभागातील तहसीलदार पदावरील अधिकारी महिलेने आपली व्यथा मांडल्याचे म्हटले जात आहे. मात्र, ही ऑडीओ क्लिप खरी की खोटी हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. की हा कोणाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा तर डाव नाही ना, अशीही शंका उपस्थित होत आहे. एकूण काही 11.11 मिनिटांची ही ऑडीओ क्लिप आहे. त्यांनी यामध्ये सुसाईड नोट (आत्महत्येच्या करणाची चिठ्ठी) असेच म्हटलेले आहे. मात्र, कोणाचेही स्पष्ट नाव घेतलेले नाही. यामध्ये सांगितले गेलेले अनुभव आणि किस्से मात्र यापूर्वीच प्रसिद्ध झालेले असले तरी हे नेमके कोणाबाबत म्हटलेय आणि या सुसाईड नोट प्रकरणाचा नेमका रोख कोणाकडे आहे हेही स्पष्ट होत नसल्याचे म्हटले जात आहे. सध्या ही क्लिप सोशल मीडियामध्ये जोरात व्हायरल होत आहे.

No comments:

Post a Comment