10 लाखांच्या खंडणीसाठी भाडेकरू कडून घरमालकांचे अपहरण. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 20, 2021

10 लाखांच्या खंडणीसाठी भाडेकरू कडून घरमालकांचे अपहरण.

 10 लाखांच्या खंडणीसाठी भाडेकरू कडून घरमालकांचे अपहरण.

2 तासात 2 आरोपी जेरबंद.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
जामखेड ः घर भाड्याने देणे जामखेड मधील घरमालकास महागात पडले आहे. दीड वर्षांपासून घरात राहणारे भाडेकरू योगेश शहादेव शिंदे यांनी घरमालक कृष्ण अशोक साळुंके बीड रोड जामखेड वय 21 यांचे राहत्या घरी काल दहा लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची घटना घडली. भाड्याने रहात आसलेल्या योगेश शिंदे यांने घरमालकास दम दिला की तु गाडीत येऊन बस नाहीतर तुझ्या आईला ठार मारु. या नंतर शेजारी रहाणारे लोक धावत बाहेर आले. त्यामुळे योगेश शिंदे रा सौताडा ता. पाटोदा जिल्हा बीड व त्याचे दोन साथीदार घटनास्थळाहुन पळुन गेले. या प्रकरणी फिर्यादी कृष्णा साळुंके याने दिलेल्या फिर्यादीवरून एकुण तीन आरोपींन विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांन कडून मिळालेली माहिती अशी फीर्यादी घरमालक कृष्णा अशोक साळुंके वय 23 वर्ष धंदा शिक्षण रा. बीड रोड जामखेड हा दि 19 रोजी रात्री आपल्या घरी झोपला आसताना मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास त्याच्या घराचा दरवाजा कोणीतरी अज्ञात दोन व्यक्तींनी वाजवला या वेळी दिड वर्षा पासुन घरातील रुम मधे भाड्याने रहाणार्‍या योगेश शहादेव शिंदे याने गेटचा दरवाजा उघडला या नंतर दोन आरोपींनी माझ्या घरात येऊन घरमालकाचे हात पाय बांधुन, तोंडाला रूमाल बांधुन व गळ्याला चाकु लावून एम एच 12 एफ के - 3897 या चारचाकी वहाणात मागच्या सिटवर बसवुन म्हणाले की कृष्णा याने दहा लाख रूपये दिले नाही तर त्यास ठार मारून टाकू. हे सर्व कृष्णा याने गाडीत ऐकले होते. या नंतर फीर्यादी याने कसेतरी गाडीतुन आपली सुटका करुन घेतली.
जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत दोन आरोपींना लपुन बसलेल्या नागेश शाळेच्या पाठीमागील भागातील एका घरातुन अटक केली. ही कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील सो ,अप्पर पोलीस अधीक्षक श्री सौरभ अग्रवाल ,डी वाय एस पी श्री अण्णासाहेब जाधव  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड ,सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडे ,गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात ,पो ना.अविनाश ढेरे ,पो कॉ संग्राम जाधव ,आबासाहेब आवारे ,अरुण पवार ,संदीप राऊत ,पो कॉ संदीप आजबे ,पो कॉ विजय कोळी चालक पो हे. कॉ. हनुमान आरसुल, महिला पोलीस मनीषा दहिरे यांनी केली आहे.
दहा लाख रुपयांच्या खंडणीसाठी भाडेकरूनेच घरमालकाचे मध्यरात्री घरात घुसून त्याचे हात पाय बांधुन व मारहाण करून अपहरण करण्याचा प्रयत्न फसला. पोलिसांनी दोन तासातच दोन आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळविले. या प्रकरणी एकुण तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment