जुगार अड्ड्यावर भिंगार कॅम्प पोलिसांचा छापा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 25, 2021

जुगार अड्ड्यावर भिंगार कॅम्प पोलिसांचा छापा.

 जुगार अड्ड्यावर भिंगार कॅम्प पोलिसांचा छापा.

29 जुगार्‍यांना अटक. 4 लाखाचा मुद्देमाल जप्त.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पोलिस उपअधिक्षक विशाल ढुमे यांना भिंगारमधील भिमनगर येथील कमानीजवळ पत्र्याच्या खोलीत मोठा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. सदर जुगार अड्ड्यावर शहर विभागाचे पोलिस उपअधिक्षक विशाल ढुमे यांच्यासह भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशीरकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा टाकत 29 जुगार्‍यांना अटक केली असून त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल व जुगाराचे साहित्य असा 3 लाख 99 हजार 650 रूपयांचा ऐवज जप्त केला आहे.
त्यानुसार पत्र्याचे खोलीत 29 जण तर नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले. जुगार खेळणारे आरोपी - विजय मुनोत रा.विनायक नगर, गणेश राजपूत रा.गवळी वाडा, योगेश सोनवणे रा.भिंगार, अब्बास शेख रा. झेंडीगेट, राजू बोंदडे भिंगार, नितीन क्षेत्रे रा. दाणे गल्ली, राहुल औटी रा.भिंगार, कैलास शिरसागर रा.पाथर्डी, गणेश टाक रा.विनायक नगर, राजू राजपूत रा.भिंगार, अरुण थोरात, रा.भिंगार, हर्षल चावला रा. मिस्किन नगर सावेडी, शुभम बोंदडे रा.भिंगार, आकाश आढाव रा.भिंगार, सोफियान कुरेशी रा.फलटण चौकी, युवराज करंजुले रा.फकीर वाडा, रामदास शिंदे रा.माळीवाडा, मधुकर मोहिते रा. आदर्श नगर कल्याण रोड, कैलास दुधाळ रा. पाथर्डी, असून संदीप काळे रा.भिंगार, अत्तर गड्डा रा.नगर आदींसह अन्य आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांनी या ठिकाणी 2 लाख 77 हजार 150 रूपयांची रोकड तसेच 1 लाख 22 हजार 500 रूपये किंमतीचे मोबाईल व जुगार खेळण्याचे साहित्य जप्त केले आहे.

No comments:

Post a Comment