पारनेर तहसीलदारां विरोधात बेमुदत काम बंद आंदोलन सुरू. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 25, 2021

पारनेर तहसीलदारां विरोधात बेमुदत काम बंद आंदोलन सुरू.

 पारनेर तहसीलदारां विरोधात बेमुदत काम बंद आंदोलन सुरू.

‘महसूल’चा कारभार ठप्प...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः राज्यातील महसूल विभागाच्या अधिकार्‍यांच्या संघटनांनी देवरे यांच्या बाजूने मुख्यमंत्र्यांसह अनेकांना निवेदने दिली. मात्र प्रत्यक्षात देवरे यांच्या समवेत काम करणारे त्यांच्या हाताखालील कर्मचारीच आता देवरे यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. पारनेर तहसील कार्यालयातील कर्मचारी व पारनेर तालुक्यातील तहसीलदार मंडलाधिकार्‍यांनी देवरे यांच्या विरोधात बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यातील महसूलचा कारभार ठप्प झाला आहे. तहसील कार्यालयाच्या दारातच हे आंदोलन सुरू झाले आहे.
पारनेर तालुका महसूल कर्मचारी व तलाठी संघटनेने तहसीलदार देवरे यांच्यावर दडपशाही व भ्रष्टाचाराचे आरोप करत चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना व मुख्य सचिवांना निवेदन दिले होते. दोन दिवसांपूर्वी संघटनेने निवासी उपजिल्हाधिकार्‍यांनाही मागणीचे निवेदन दिले होते. या निवेदनातून तहसीलदार देवरे यांची बदली करा अथवा आमच्या सर्वांच्या पारनेर तालुक्यातून बदल्या करा अशी मागणी करण्यात आली. मागणी पूर्ण होत नसल्याने पारनेर तहसील कार्यालयातील कर्मचारी व पारनेर तालुक्यातील तहसीलदार मंडलाधिकार्‍यांनी देवरे यांच्या विरोधात बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यातील महसूलचा कारभार ठप्प झाला आहे. तहसील कार्यालयाच्या दारातच हे आंदोलन सुरू झाले आहे.

No comments:

Post a Comment