स्वाती इंगळे यांची पारनेर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 24, 2021

स्वाती इंगळे यांची पारनेर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड

 स्वाती इंगळे यांची पारनेर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः  पारनेर तालुका राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्षपदी सुपा येथील स्वाती सुधीर इंगळे यांची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.  आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून ते सध्या तालुक्यात कार्यरत असून अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या  जिल्हाध्यक्षा राजेश्वरीताई कोठावळे व पारनेर तालुका राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा पुनमताई मुंगसे यांनी त्यांची निवड जाहीर केली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून ते अनेक दिवसांपासून कार्यरत असून युवती संघटना मजबूत करण्यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका  पार पाडली आहे.  स्वाती इंगळे यांनी आतापर्यंत अनेक युवतींना विद्यार्थ्यांना त्यांनी आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून काम करत असताना सुपा परिसरामध्ये त्यांनी अनेक  युवतींचे व महिलांचे प्रश्न  सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा राजेश्वरीताई कोठावळे यांच्या माध्यमातून त्या सक्रिय असून आमदार निलेश लंके यांच्या सामाजिक विचारांची प्रेरणा घेऊन ते काम करत आहेत.  राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्षपदी निवड करून त्यांच्या कामाची खर्‍या अर्थाने राजेश्वरीताई कोठावळे व पुनमताई  मुंगसे यांनी दखल घेतली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पारनेर तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे  जिल्हा परिषद सदस्या राणीताई निलेश लंके राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षा राजेश्वरीताई कोठावळे  पारनेर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा सुवर्णाताई घाडगे, सुपा ग्रामपंचायत सदस्या  सुरेखाताई पवार, पारनेर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीचा नेत्या मायाताई रोकडे,  यांनी यावेळी स्वातीताई इंगळे यांचे निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.

युवतींचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध :  स्वाती इंगळे
पारनेर तालुका राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर स्वाती इंगळे बोलताना म्हणाल्या की युवतींचे समाजात असलेले अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आमदार निलेश लंके व जिल्हाध्यक्षा  राजेश्वरीताई कोठावळे  व पुनमताई मुंगसे यांच्या माध्यमातून मी कटिबद्ध आहे. यापुढे पदाच्या माध्यमातून काम करत असताना शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणार आहे.

राजेश्वरीताई कोठावळे यांच्या खांद्याला खांदा लावून स्वातीताई करतात काम..
 अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा राजेश्वरी ताई कोठावळे यांच्या सामाजिक कामांमध्ये  स्वातीताई इंगळे या नेहमी पुढे असतात  राजेश्वरीताई कोठावळे यांचे रक्तदान शिबिर, वृक्षारोपण शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप महिला सक्षमीकरणासाठी सुरू असलेले कार्य या सर्व कार्यामध्ये व सामाजिक कामांमध्ये  राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या नवनिर्वाचित कार्याध्यक्ष स्वातीताई इंगळे  राजेश्वरी कोठावळे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.

No comments:

Post a Comment