पर्यावरण हा मानवाचा मित्र- पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, August 7, 2021

पर्यावरण हा मानवाचा मित्र- पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी

 पर्यावरण हा मानवाचा मित्र- पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी

मानवता सेवा संघटनेच्या वतीने नागरिकांना वृक्षांचे वाटप


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
पर्यावरण हा मानवाचा एक मित्र आहे वनराई मुळे आपल्याला आनंद मिळतो त्यातील वृक्षा मुळे वतावरणातील ऑक्सिजन शुद्ध असतो. त्यामुळे मानवाच्या आरोग्य निरोगी व सुदृढ राहण्यास मदत होते यासाठी वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. तरी प्रत्येक नागरिकांनी एक तरी वृक्ष लावून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल,दिवसेंदिवस वातावरणात होत चाललेल्या बदलामुळे पर्यावरणाचा र्‍हास झाला आहे.त्यामुळे निसर्गाची हानी झाली आहे त्यातून आता मानवी जीवनाची हानी होत आहे,मानवता सेवा संघटनेने सामाजिक बांधिलकीतून व सकारात्मक दृष्टीकोनातून आपले कर्तव्य पार पाडत आहे ही बाब कौतुकास्पद आहे. 24तास ऑक्सिजन देणारे वृक्ष व आयुर्वेदिक वृक्षाचे वाटप करून समाजाप्रती असलेली बांधिलकी जोपासण्याचे काम करत असल्याचे प्रतिपादन तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी केले.
मानवता सेवा संघटनेच्या वतीने नागरिकांना 24 तास ऑक्सीजन देणारे व आयुर्वेदिक वृक्षांचे वाटप तोफखाना पोलीस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले समवेत वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष तथा विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ.सागर बोरुडे, अ‍ॅड.योगेश गेरंगे, रिना पंडित, सुरेख पूलपगार, वैशाली राजहंस, कांचन इंगवले,श्रुतिका दरेकर, मच्छिंद्र म्हस्के,विशाल देवकाते, यशवंत तोडमल, विनोद जोंधळे, दीपक चावरीय,अजित साळवे, दत्तात्रय जंगले, उद्धव शिंदे,माया शिंदे, रंजना उकिरडे, हेमलता कांबळे, साधना बोरुडे,अनिता भोसले, ओंकार बोठे, शुभम शिंदे,प्रज्वल शेकटकर, गणेश बारस्कर, विकास घोलप, आकाश पवार, पंकज भांबळ,कृष्णा वायकर, आदित्य काकडे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here