ग्रामविकासाचा गोरेगाव पॅटर्न भावला ः खा. डॉ. विखे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 25, 2021

ग्रामविकासाचा गोरेगाव पॅटर्न भावला ः खा. डॉ. विखे

 ग्रामविकासाचा गोरेगाव पॅटर्न भावला ः खा. डॉ. विखे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः  लोकसभा विजयानंतर प्रथमच खासदार डॉ.सुजय विखे यांनी मॉडेल व्हिलेज गोरेगावला सदिच्छा भेट दिली,त्या प्रसंगी ते बोलत होते.गोरेगाव ग्रामपंचायतच्या वतीने डॉ.सुजय विखे यांचा नागरी सत्कार करण्यात आला.याप्रसंगी पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके,भाजपा तालुकाध्यक्ष वसंत चेडे,शिवसेना तालुका प्रमुख विकास रोहोकले,राहुल पाटील शिंदे,मा.सभापती बाबासाहेब तांबे,सुभाष दुधाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना खासदार विखेंनी आरोग्य यंत्रणा आणि ग्रामपंचायत प्रशासन यांचा समन्वय राहिला पाहिजे असे मत व्यक्त केले.गाव तालुका जिल्हा स्तरावर लसीकरणाची टक्केवारी समान असली पाहिजे.त्यासाठी सुधारित नियमावली तयार करत असल्याचे या वेळी सांगितले.बाबासाहेब तांबे यांच्या नेतृत्वात गोरेगावने ग्रामविकासाचा नवा पॅटर्न विकसित केला असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.राज्यात महाविकास आघाडी असली तरी बाबासाहेब तांबे यांनी पारनेर तालुका भाजपा आणि शिवसेना यांच्यात समन्वय राखण्यासाठी पुढाकार घ्यावा असे मत व्यक्त केले.
मा.सरपंच राजाराम नरसाळे यांच्या हस्ते खा.सुजय विखेंचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी   उपसरपंच दादाभाऊ नरसाळे,चेअरमन भागाजी नरसाळे,व्हा.चेअरमन नाना तांबे,ग्रा.पं सदस्य आण्णा पाटील नरसाळे,वामन चौरे,संपत नरसाळे,गणपत तांबे,बजू तांबे,सोमनाथ तांबे,विकास काकडे,पत्रकार राम तांबे,अनिल पाटील नरसाळे, ऋषीकेश नरसाळे,भाऊसाहेब तांबे,विजय तांबे,आदि सह ग्रामस्थ उपस्थित होते.प्रास्तविक प्रा.प्रभाकर नरसाळे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दिशा फाऊंडेशन चे अध्यक्ष संदीप तांबे यांनी केले.

No comments:

Post a Comment