मतदार जागृतीच्या निबंध व पोस्टर स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 25, 2021

मतदार जागृतीच्या निबंध व पोस्टर स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

 मतदार जागृतीच्या निबंध व पोस्टर स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

निबंध स्पर्धेत मयुरी डोंगरे, अरिफा शेख तर पोस्टर स्पर्धेत उत्कर्ष शेटीया, उन्नती शेटीया प्रथम


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः
मतदार जागृतीसाठी अहमदनगर जिल्हा प्रशासन, निवडणुक विभाग, नेहरु युवा केंद्र, श्री नवनाथ युवा मंडळ, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ऑनलाईन निबंध व पोस्टर स्पर्धेला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. पोस्टर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मतदान जागृतीचा संदेश देणारे घोषवाक्यासह विविध चित्र रेखाटले. तर निबंधातून लोकशाहीसाठी मतदानाचे महत्त्व विशद केले.
मतदार जागृतीसाठी शालेय व महाविद्यालयीन गटात ही स्पर्धा निशुल्क घेण्यात आली. निबंध स्पर्धा लहान गट (इयत्ता 8 वी ते 10 वी) प्रथम- मयुरी विजय डोंगरे (निमगाव वाघा), द्वितीय- गायत्री भाऊसाहेब ढोकणे (गोपाळपूर, ता. नेवासा), तृतीय- तेजस मारुती कदम (वाडेगव्हाण, ता. पारनेर), मोठा (महाविद्यालयीन) गट प्रथम- अरिफा मिराबक्ष शेख (श्रीरामपूर), द्वितीय- निर्मल संजय छाजेड (बुरुडगाव रोड, नगर), तृतीय- सोमनाथ भाऊसाहेब ढोकणे (गोपाळपूर, ता. नेवासा),
तसेच पोस्टर स्पर्धेत लहान गट (इयत्ता 8 वी ते 10 वी) प्रथम- उत्कर्ष नितीनकुमार शेटीया (केडगाव, नगर), द्वितीय- पियुष मुकेश शिनगारे (नालेगाव, नगर), मोठा (महाविद्यालयीन) गट प्रथम- उन्नती नितीनकुमार शेटीया (केडगाव, नगर), द्वितीय- राजदीप रेवन्नाथ पानगे (पाईपलाइन रोड, नगर), तृतीय- मनोज भाऊसाहेब शिंदे (बोल्हेगाव, नगर) यांनी बक्षिसे पटकाविली.
लोकशाही सदृढ व बळकट होण्यासाठी मतदानाची टक्केवारी वाढण्याची गरज असून, यादृष्टीकोनातून मतदार जागृती होण्यासाठी या निबंध व पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकाच्या विजयी स्पर्धकांना बक्षिस देण्यात येणार आहे. तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. विजेत्या स्पर्धकांचे युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, डोंगरे संस्था तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी अभिनंदन केले. या स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युवा मंडळाच्या सचिव प्रतिभा डोंगरे, गौतम फलके, अक्षय ठाणगे, ऋषीकेश बोडखे यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment