केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचा घोडेगावमध्ये शिवसेनेकडून निषेध - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 25, 2021

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचा घोडेगावमध्ये शिवसेनेकडून निषेध

 केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचा घोडेगावमध्ये शिवसेनेकडून निषेध


नगरी दवंडी/प्रतिनिधी
घोडेगाव ः राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे घोडेगाव  चौफुला येथे शिवसेनेच्या वतीने मंगळवारी शिवसेना उपतालुका प्रमुख पंकज लांभाते यांच्या उपस्थितीत हल्लाबोल व निदर्शने झाली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान रायगड जिल्ह्यातील महाड येथे पत्रकारांशी वार्तालाप करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी एकेरी भाषेत वक्तव्य केल्याने  शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत हे वक्तव्य अशोभणीय असुन  लोकशाहीच्या विरोधात आहे नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांची जाहीर माफी मागावी. नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी एकमुखी मागणी करून यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही असा इशारा यावेळी दिला. यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख पंकज लांभाते, शहर प्रमुख राजेंद्र येळवंडे,बाळासाहेब सोनवणे, शरद सोनवणे, अनिल सोनवणे, नवनाथ वैरागर, कल्याण इखे,सदानंद गाडेकर, ज्ञानदेव सोनवणे,संतोष इखे, संदीप येळवंडे,रमेश जाधव, शिवा इखे,अशोक जाधव, ज्ञानेश्वर ढवाण आदि शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते. सोनई पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कर्पे साहेब व त्यांचा स्टाफ  उपस्थित होता,घोडेगावचे  पोलिस पाटील बाबासाहेब वैरागर यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment