महाराष्ट्र राज्य सभा पुणे आयोजित राष्ट्रभाषा पंडित परीक्षेत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, August 21, 2021

महाराष्ट्र राज्य सभा पुणे आयोजित राष्ट्रभाषा पंडित परीक्षेत

 महाराष्ट्र राज्य सभा पुणे आयोजित राष्ट्रभाषा पंडित परीक्षेत

प्रा. पोपटराव आवटे यांना राष्ट्रभाषा पंडित ही पदवी प्रदान


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः  नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर (नेवासा फाटा) येथील प्राध्यापक पोपटराव हरिश्चंद्र आवटे यांना राष्ट्रभाषा पंडित ही पदवी प्रदान करण्यात आली आहे.
प्राध्यापक पोपटराव आवटे हे शेवगाव तालुक्यातील जनता शिक्षण प्रसारक मंडळ दहीगाव ने संचलित भातकुडगाव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी विषयाचे प्राध्यापक म्हणून काम बघत आहेत.
पोपटराव हरिश्चंद्र आवटे यांनी राष्ट्रभाषा हिंदी पंडित या विषयाची परीक्षा 2019 मध्ये अहमदनगर येथील केंद्र पाऊलबुद्धे महाविद्यालयांमध्ये दिली होती. या परीक्षेसाठी हिंदी भाषा विज्ञान, हिंदी साहित्यशास्त्र, हिंदी साहित्याचा इतिहास, हिंदी गद्य पद्य हे विषय अभ्यासासाठी होते. या विषयात विशेष श्रेणी प्राप्त केल्यामुळे त्यांना पुणे येथील महाराष्ट्र राज्यसभेचे अध्यक्ष उल्हास पवार, कार्याध्यक्ष डॉ.विना मनचंदा, परीक्षा समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम पगारे यांच्या हस्ते राष्ट्रभाषा पंडित ही पदवी व प्रमाणपत्र देण्यात आले.
प्रा.पोपटराव आवटे यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.आमदार डॉ.नरेंद्र घुले पाटील, सचिव मा.आमदार चंद्रशेखर घुले पाटील, अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. राजश्री घुले पाटील, प्रशासकीय अधिकारी कारभारी नजन, विद्यालयाचे प्राचार्य दिलीप मोटकर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद, गावातील प्रतिष्ठीत ग्रामस्थांसह शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

No comments:

Post a Comment