अल्पवयीन मुलीचा विवाह संबंधितांवर गुन्हे दाखल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, August 9, 2021

अल्पवयीन मुलीचा विवाह संबंधितांवर गुन्हे दाखल.

 अल्पवयीन मुलीचा विवाह संबंधितांवर गुन्हे दाखल.

14 व्या वर्षी विवाह.. 15 व्या वर्षी बाळंतपन...

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः चौदाव्या वर्षी मुलीचा विवाह झाल्यानंतर ती पंधराव्या वर्षी गर्भवती झाली पुरेशी गर्भाची वाढ न झाल्याने  बाळ जन्मताच मयत होते.अल्पवयीन मुलीच्या विवाहाची ही व्यथा एमआयडीसी पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर मुलीचे आई-वडील, सासू-सासरे, पती यांचे विरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण व बाल विवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर घटनेची हकीकत अशी की, नगर मनमाड रोड वरील एक गावातील अल्पवयीन मुलीचे तिच्या आईवडिलांनी मागील वर्षी गावातीलच एका मुलासोबत लग्न लावून दिले होते. वर्षभरातच मुलीला गर्भधारणा झाली. बाळंतपणासाठी काही दिवसांपूर्वी ही मुलगी माहेरी आली होती. 28 जुलै रोजी तिला प्रसुती वेदना सुरू झाल्याने तिला नगर शहरातील बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी मुलीची प्रसूती झाली मात्र तिचे बाळ जन्मताच मयत होते. मुलगी अल्पवयीन असल्याने ही बाब हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या निदर्शनास आल्यानंतर याची माहिती एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली त्यानंतर पोलिसांनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये धाव घेत मुलीचा जबाब घेतला आणि माहेर व सासरच्या नातेवाईकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. नगर एमआयडीसी येथे याआधीच 30 जुलै रोजी देखील अशाच स्वरूपाचा एक गुन्हा दाखल झाला आहे. त्याचा तपास करत असतानाच हा नवीन प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्यानंतर कमी वयात गर्भधारणा झाल्याने मुलींच्या शरीरावर वाईट परिणाम होतो त्यामुळे काही वेळा त्यांच्या जीवितास देखील धोका तयार होतो मात्र याबद्दल काही पालकांना ज्ञानच नसते त्यामुळे असे प्रकार घडतात.

No comments:

Post a Comment