जिल्ह्यासाठी 8 सरकारी वकिलांची नियुक्ती. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, August 9, 2021

जिल्ह्यासाठी 8 सरकारी वकिलांची नियुक्ती.

 जिल्ह्यासाठी 8 सरकारी वकिलांची नियुक्ती.

राज्याचे उपसचिवांचे आदेश...

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राज्यातील विविध न्यायालयात कार्यरत असणार्या सहायक सरकारी वकिलांना सन 2020- 21 च्या निवडसूचीतून अतिरिक्त सरकारी वकिल पदावर तात्पुरती पदोन्नती देण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यासाठी नव्याने आठ अतिरिक्त सरकारी वकिल मिळाले आहेत. याबाबतचे आदेश महाराष्ट्र राज्याचे उप सचिव (विधी) किशोर भालेराव यांनी नुकतेच काढले आहेत.
राज्यातून जिल्ह्यामध्ये पदोन्नतीवर आलेले अतिरिक्त सरकारी वकिल, पदस्थापना- श्रीमती संगिता अनिल ढगे (सत्र न्यायालय, श्रीगोंदा), संंदीप अर्जुन दिवेकर (सत्र न्यायालय, श्रीरामपूर), जयंत काशिनाथ दिवरे (सत्र न्यायालय, संगमनेर), वैशाली राहुल राऊत-रासवे (सत्र न्यायालय, नगर), चंद्रकांत दिनकरराव सपकाळ (सत्र न्यायालय, नेवासा), प्रवीण विठ्ठलराव बुलबुले (सत्र न्यायालय, कोपरगाव), कोमल विश्वनाथ राठोड (सत्र न्यायालय, नगर), राहुल लक्ष्मणराव कोळेकर (सत्र न्यायालय, नगर) असे आहेत. सदर अतिरिक्त सरकारी वकिलांनी त्यांना देण्यात आलेल्या पदोन्नतीच्या पदस्थापनेच्या ठिकाणी तात्काळ हजर होवून पदाचा कार्यभार घ्यावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नव्याने आलेल्या अतिरिक्त सरकारी वकिलांचे अहमदनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष भूषण बर्हाटे, अ‍ॅड. सुरेश लगड यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment