संकट कोणतेही असो, घर घर लंगर सेवा मदतीसाठी नेहमी सज्ज - आ. जगताप. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, August 9, 2021

संकट कोणतेही असो, घर घर लंगर सेवा मदतीसाठी नेहमी सज्ज - आ. जगताप.

 संकट कोणतेही असो, घर घर लंगर सेवा मदतीसाठी नेहमी सज्ज - आ. जगताप.

नगरची लंगर सेवा धावली पूरग्रस्तांच्या मदतीला...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
संकट कोणतेही असो, घर घर लंगर सेवा नेहमीच सज्ज आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून लंगर सेवेने गरजू घटकांना दोन वेळचे जेवण पुरविण्याचे कार्य सुरु आहे. टाळेबंदीत जनवारांच्या चार्‍याचा व  खाद्याचा प्रश्न देखील सोडवला. अन्नदानाबरोबरच निशुल्क कोविड सेंटर चालवून सर्वसामान्य घटकांना आधार देण्याचे काम त्यांनी केले. ऑक्सिजनची कमतरता भासत असताना गरजूंना मोफत ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करुन देण्यात आले . तसेच ऑनलाईन शिक्षणासाठी गरीब विद्यार्थ्यांना स्मार्ट मोबाईल व लॅपटॉप देण्याचा प्रेरणादायी उपक्रम त्यांनी राबविला. महाराष्ट्रातील काही भागात पूरामुळे अनेक कुटुंबाचे संसार उघड्यावर आले असताना त्यांना आधार देण्यासाठी लंगर सेवा सरसावली आहे. राज्यासह देशात कोणत्याही ठिकाणी संकट आल्यास नगरकरांनी नेहमीच मदतीचा हात दिला असल्याचे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केले आहे.
कोकणातील महाड, चिपळूणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी शहरातील घर घर लंगर सेवेच्या वतीने जीवनावश्यक वस्तू, किराणा सहित्य, अन्न-धान्य, स्वच्छता साहित्य, कपडे, ब्लँकेट, टॉवेल, कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन कॅन, कोरोना प्रतिबंधासाठी मास्क, सॅनिटायझर, प्रथमोपचाराची औषधी किटची मदत घेऊन ट्रक पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रवाना करण्यात आला.
आमदार जगताप यांनी देखील सेवादारांसह मदतीचे साहित्य ट्रक मध्ये भरण्यास हातभार लावला. कोकणातील महाड, चिपळूणसह पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी घर घर लंगर सेवेने मदतीचे आवाहन केले आहे. या आवहानाला प्रतिसाद देत नागरिक, दानशूर व्यक्ती व सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. या उपक्रमासाठी अहमदनगर जिल्हा पोलीस दल व लायन्स क्लब ऑफ अहमदनगरचे सहकार्य लाभत आहे. पहिल्या टप्प्यातील मदत रवाना करण्यात आली. यावेळी आमदार अरुणकाका जगताप यांनी देखील लंगर सेवेच्या या प्रकल्पाला भेट देऊन सुरु असलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
प्रास्ताविकात हरजितसिंह वधवा यांनी काही पूरग्रस्त भागातील नागरिकांचे जनजीवन पुर्णत: विस्कळीत झाले आहे. त्यांचे संसार वाहून गेले असून, त्यांना आधार देण्यासाठी घर घर लंगर सेवेने मदतीचा हात दिला आहे. मदतीबरोबरच पूरग्रस्त भागातील गरजूंसाठी तेथील स्थानिक स्वयंसेवक घेऊन लंगर सेवा चालविण्याचा मानस आहे. यासाठी शहरातील लंगर सेवेचे सर्व सेवादार योगदान देण्यास कटिबध्द राहणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांनी सामाजिक संवेदना जागृक ठेऊन नेहमीच घर घर लंगर सेवेने गरजूंना मदत केली आहे. कोरोनाचे संकट असो किंवा महापूर लंगर सेवा सेवेच्या सेवादारांची सामाजिक बांधिलकी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी श्रीरामपूरचे विभागीय पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके, जनक आहुजा, हरजितसिंह वधवा, प्रितपालसिंह धुप्पड, लायन्स क्लब ऑफ अहमदनगरचे अध्यक्ष डॉ. अमित बडवे, राहुल बजाज, प्रशांत मुनोत, सुनील छाजेड, मनोज मदान, अजय पंजाबी, करण धुप्पड, विपुल शाह, सुनील थोरात, कैलाश नवलानी, किशोर मुनोत, राम बालानी, प्रमोद पंतम, पुरुषोत्तम बेट्टी, शरद बेरड, नारायण अरोरा, जय रंगलानी, डॉ. नलवडे, कबीर धुप्पड, अर्जुन मदान, गोविंद खुराणा, आनंद बोरा, गोपाळ खुराणा, सिमरजीतसिंह वधवा, राजा नारंग, मनु कुकरेजा, पवन झंवर, जयेश पाटील, राजेंद्र कंत्रोड, सतीश गंभीर, राजू जग्गी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment