महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांचे संगठण वाढवणार ः प्रद्युम्न शुक्ला - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 31, 2021

महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांचे संगठण वाढवणार ः प्रद्युम्न शुक्ला

 महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांचे संगठण वाढवणार ः प्रद्युम्न शुक्ला


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महाराष्ट्रात राहणार्‍या उत्तर भारतीय नागरिकाना एकत्रीत घेऊन भाजपचे संघटन वाढवणार असून भाजपने केलेल्या कामाची माहिती देणे . तसेच जिल्ह्यासही उत्तर भारतीय आघाडीशी एकत्र आणणे आणी भाजपाचे काम या  म माध्यमातून वाढवणे हे उत्तर भारतीय आघाडीचे उद्दिष्ट असल्याचे  महाराष्ट्र प्रदेश महामंत्री उत्तर भारतीय मोर्चाचे प्रद्दून्म शुक्ला यांनी नगर येथील  दौर्‍यात  सांगीतले .
 अहमदनगर उत्तर जिल्ह्याची उत्तर भारतीय आघाडीची शिर्डी येथे बैठक होती. या बैठकी निमित्त अहमदनगर जिल्ह्यातील शहर, दक्षिण व उत्तर या तीनही विभागात प्रवास करून उत्तर भारतीय आघाडीचे काम कितपत वाढले हे पाहण्यासाठी या दौर्‍याचे नियोजन केले असल्याचे शुक्ला म्हणाले. अहमदनगर येथे भाजपचे जिल्हा सरचिटणीस दिलीप भालसिंग यांनी त्याचा सन्मान केला . यावेळी जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांच्या उपस्थितीत उत्तर भारतीय आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष म्हणून विनय शुक्ला यांची नेमणूक केली.
 नगर जिल्हा भाजपाचे संगठन सरचिटणीस दिलीप भालसिंग म्हणाले, भाजपच्या जिल्ह्यातील सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन उत्तर भारतीय मोर्चाची व नगर दक्षिणची कार्यकारिणी संदर्भात जिल्हाध्यक्ष यांच्या सूचनेनुसार  प्रद्दून्म शुक्ला यांच्याशी चर्चा केली. यामध्ये नगर ग्रामीण मध्ये दरेवाडी, वाकोडी, सुपा, नगर दक्षिण, या भागात मोठया प्रमाणात उत्तर भारतीय लोकं स्थायिक झाले आहेत. उत्तर भारतीयांचा हा वर्ग कायमस्वरूपी एका ठिकाणी राहतो, त्यांना एकत्र करून जिल्हाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अध्यक्षांची लवकर नियुक्ती करून उत्तर भारतीय मोर्चाचे दक्षिणेत संघटन करून कामकाजाला सुरुवात करणार आहोत.
यावेळी नवीन सिंग, बाबासाहेब जाधव, गणेश भालसिंग, बबन आव्हाड उपस्थित होते.

No comments:

Post a Comment