प्रा. संजय धोपावकर यांचे क्रीडा क्षेत्रातील कार्य खेळाडूंसाठी प्रेरणादायी ः धनंजय जाधव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 31, 2021

प्रा. संजय धोपावकर यांचे क्रीडा क्षेत्रातील कार्य खेळाडूंसाठी प्रेरणादायी ः धनंजय जाधव

 प्रा. संजय धोपावकर यांचे क्रीडा क्षेत्रातील कार्य खेळाडूंसाठी प्रेरणादायी ः धनंजय जाधव

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा सत्कार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शालेय शिक्षणाबरोबरच आजच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रातील खेळांचे धडे गिरवावे कारण क्रीडा क्षेत्रांमध्येही करिअर करण्याची संधी उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या खेळामध्ये एकरूप होऊन ध्येय,चिकाटी व मेहनतीच्या जोरावर यश संपादन करावे,यशाला भुरळून न जाता खेळामध्ये सातत्य टिकविण्यासाठी मेहनत करावी क्रीडा प्रशिक्षक प्रा.संजय धोपावकर यांनी शहरामध्ये विविध खेळाडू घडविले आहे.त्यांच्या खेळाडूनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपल्या कलागुणांच्या जोरावर विविध पदके मिळवली आहे,आत्तापर्यंत सहा खेळाडूंना छत्रपती विजेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त यंग मेन्स जुदो क्लब सिद्धीबाग यांच्या वतीने छत्रपती पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करून युवा खेळाडूंच्या समोर एक आदर्श ठेवला आहे.यशाला पर्याय नसतो त्यासाठी कष्ट करावे लागते आपल्या जडणघडणीमध्ये गुरुवार्‍यायांच्या मार्गदर्शनाची खरी गरज असल्याचे प्रतिपादन अ‍ॅड. धनंजय जाधव यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय क्रीडा दिन निमित्ताने यंग मेन्स जुदो क्लब सिद्धीबाग यांच्या वतीने छत्रपती पुरस्कार विजेते प्राजक्ता नगरकर,अंजली देवकर, मनीषा पुंडे यांचा सत्कार करतांना ड.धनंजय जाधव समवेत क्रीडा प्रशिक्षक प्रा.संजय धोपावकर,अंजय कुलकर्णी, सुहास विश्वासराव,पद्मजा धोपावकर,फिरोज सय्यद, विनीत बुरला, गणेश लांडगे,आदित्य धोपावकर, शुभम दातरंगे आदी सह खेळाडू उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्राध्यापक संजय धोपावकर म्हणाले की,मेजर ध्यानचंद यांनी आपल्या देशाला ऑलिंपिक स्पर्धेमध्ये तीन गोल्ड मेडल मिळवून दिले आहे.त्यांचे कार्य आत्मसात करून युवा खेळाडूने खेळामध्ये आपले प्रदर्शन करावे, आपल्या नावाची ओळख ही स्वतः निर्माण करण्यासाठी खेळांचे माध्यम हे योग्य आहे.खेळामधून मान,सन्मान व प्रतिष्ठा मिळत असते मिळालेले यश टिकविण्यासाठी मेहनतीची खरी गरज आहे.जय-पराजयाकडे लक्ष न देता खेळामध्ये सातत्य टिकवण्यासाठी प्रयत्नशील रहा, विविध खेळांमध्ये करिअर करण्याच्या संधी उपलब्ध असून ध्येय निश्चित करून यशाच्या शिखराकडे वाटचाल करा असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment