घरपट्टीमध्ये थकबाकीदारांना सवलत मिळण्याच्यादृष्टीने लोकअदालतमध्ये भाग घ्यावा ः सौ. शेंडगे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 31, 2021

घरपट्टीमध्ये थकबाकीदारांना सवलत मिळण्याच्यादृष्टीने लोकअदालतमध्ये भाग घ्यावा ः सौ. शेंडगे

 घरपट्टीमध्ये थकबाकीदारांना सवलत मिळण्याच्यादृष्टीने लोकअदालतमध्ये भाग घ्यावा ः सौ. शेंडगे

घरपट्टी वसुलीबाबत आढावा बैठक संपन्न


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मनपा हद्दीतील घरपट्टी व पाणीपट्टी वसुली संदर्भात मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी मा.आयुक्त श्री.शंकर गोरे, उपमहापौर मा.श्री.गणेश भोसले, स्थायी समितीचे सभापती मा.श्री.अविनाश घुले, माजी शहर प्रमुख मा.श्री.संभाजी कदम, नगरसेवक मा.श्री.अनिल शिंदे, मा.श्री.गणेश कवडे, मा.श्री.सचिन शिंदे, अतिरिक्त आयुक्त श्री.प्रदिप पठारे, उपायुक्त श्री.यशवंत डांगे, श्री.श्रीनिवास कुरे, सहाय्यक आयुक्त श्री.संतोष लांडगे, श्री.सचिन राऊत, श्री.दिनेश सिनारे, प्रभाग अधिकारी श्री.सोनवणे, श्री.गोसावी,श्री.सुखदेव गुंड, श्री.सुनिल चाफे, श्री.राजेश लयचेट्टी, श्री.राजू नराल आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर मा.सौ.रोहिणीताई शेंडगे म्हणाल्या की, दैनंदिन घरपट्टी वसुली बाबत प्रभाग अधिकारी यांचेकडून आढावा घेतला. सद्यस्थितीत वसुली कमी प्रमाणात होत आहे असे निदर्शनास आले आहे. बरेच नागरिक घरपट्टी भरण्यास तयार असतात. त्यांच्याकडे वसुली लिपीक जात नाही. वसुली लिपीक प्रभागामध्ये फिरून मालमत्ताधारकांना घरपट्टी भरणे बाबत प्रोत्साहित केल्यास मालमत्ताधारक घरपट्टी भरतील. नागरिकांच्या घरपट्टी संदर्भात असलेल्या अडचणी सोडविणे वसुली लिपीक यांनी  कार्यवाही करावी. त्यामुळे देखील भरणा वाढण्यास मदत होईल. ऑगस्ट 2021 अखेर 21 कोटी वसुली झाली असून यापुढील काळात जास्तीत जास्त घरपट्टी वसुली बाबत कार्यवाही करावी. गेल्या महिन्यामध्ये लोक अदालत द्वारे घरपट्टी संदर्भातील अडचणी सोडवून मालमत्ताधारकांना दिलीसा देण्यात आला होता त्यामुळे मोठया प्रमाणात नागरिकांनी घरपट्टी भरली याच धर्तीवर 25 सप्टेंबर 2021 रोजी मनपाच्या वतीने घरपट्टी संदर्भात लोक अदालत घेण्यात येणार असून त्यामध्ये थकबाकीदारांना 75 टक्के शास्ती माफी मिळेल. याकरिता नागरिकांनी लोक अदालतमध्ये भाग घेण्यासाठी संबंधीत प्रभाग अधिकारी यांचेशी संपर्क साधून अर्ज सादर करावे व या योजनेचा लाभ घेवून मनपास सहकार्य करावे. नागरिकांना या संदर्भात माहिती होण्यासाठी सोशल मिडीया, घंटागाडी या माध्यमातून नागरिकांना अवाहन करण्याबाबत कार्यवाही करावी. तसेच शहर व उपनगरामध्ये अनाधिकृत नळकनेक्शन धारकांसाठी नळ कनेक्श अधिकृत करणे बाबत कार्यवाही सुरू आहे. नागरिकांनी नळ कनेक्शन अधिकृत करून घ्यावेत. नागरिकांना याबाबत माहिती होण्यासाठी घंटागाडी, सोशल मिडीया द्वारे कळविण्याबाबत कार्यवाही करावी.
मा.उपमहापौर श्री.गणेश भोसले म्हणाले की, घरपट्टी नागरिक भरण्यास तयार असतात त्यांच्यासाठी ज्या काही योजनेद्वारे सवलत दिली जाते त्याची माहिती नागरिकांना नसते. लोकअदालत मध्ये घरपट्टी भरण्या संदर्भात सवलत देत असल्याबाबत नागरिकांना कळवा.  
यावेळी मा.आयुक्त श्री.शंकर गोरे म्हणाले की, गेल्या दोन तीन महिन्यामध्ये नागरिकांनी घरपट्टी भरून मनपास सहकार्य केले आहे. थकबाकीदारांना दिलासा देण्यासाठी लोक अदालत चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ब-याच नागरिकांनी सहभाग घेवून घरपट्टी भरली आहे. याच दृष्टिने नागरिकांच्या हिताच्या दृष्टिने 25 सप्टेबर 2021 रोजी लोक अदालतचे आयोजन करण्यात आले असून सर्व थकबाकीदार मालमत्ताधारकांनी लोक अदालतमध्ये अर्ज दाखल करावे व घरपट्टी भरून मनपास सहकार्य करावे. तसेच अनाधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करण्याची मोहिम सुरू असून अनाधिकृत नळ कनेक्शन धारकांनी नळ कनेक्शन अधिकृत करून घ्यावे. या योजनेची मुदत संपल्यानंतर संबंधीतांवर कडक कार्यवाही करण्यात येईल. घरपट्टी थकबाकी वसुली संदर्भात झोन वाईज टिम तयार करण्यात आली असून प्रत्येक झोनसाठी एक सहाय्यक आयुक्ताची नेमणुक करण्यात आली असून उपायुक्त कर या टिम बाबत नियोजन करतील या सर्व टिमचे प्रमुख म्हणून अतिरिक्त आयुक्त यांचेकडे जबाबदारी देण्यात आलेली आहे. नागरिकांनी थकीत असलेली घरपट्टी भरून मनपास सहकार्य करावे व होणारी कार्यवाही टाळावी.

No comments:

Post a Comment