व्यवसायिकांना उद्योजकांना दक्षता पथकांनी नाहक त्रास देऊ नये- उपमहापौर गणेश भोसले. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 10, 2021

व्यवसायिकांना उद्योजकांना दक्षता पथकांनी नाहक त्रास देऊ नये- उपमहापौर गणेश भोसले.

 व्यवसायिकांना उद्योजकांना दक्षता पथकांनी नाहक त्रास देऊ नये- उपमहापौर गणेश भोसले.

निर्बंधांमुळे व्यापारी हवालदिल....


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
कोविड मुळे सर्वांचे अर्थचक्र थांबले आहे. अहमदनगर महानगरपालिकेच्या दक्षता पथकाने नागरिकांमध्ये कोरोनाची जनजागृती करावी,आपले काम वसुली व दंड करण्याची नाही.  पैसे गोळा करणे हा आपला उद्देश नसून कोरोना थोपवणे आपला उद्देश आहे.गर्दीच्या ठिकाणी नागरिकांमध्ये व व्यावसायिकांमध्ये कोरोनाची जनजागृती करावी. दुकाने बंद असतांना कोणीही दुकानाचे गेट वाजवू नये, दंडही करू नये. आधीच कोविड परिस्थितीत व्यापारी हवालदिल असताना महापालिकेच्या माध्यमातून त्यांना त्रास देणे आपले काम नाही., त्यांना समजावून सांगणे हे आपले काम आहे तरी यापुढे व्यावसायिकांना व उद्योजकांना नाहक त्रास देण्याचे काम थांबवावे अशा सूचना उपमहापौर गणेश भोसले यांनी मनपा दक्षता पथकास दिल्या आहेत. याप्रसंगी उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की गेल्या दीड-दोन वर्षांपासून कोविडचे संकट आपल्यावर ओढवले आहे,कोरोना संसर्ग विषाणूला थोपविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने दोन वेळा लॉकडाऊन केला होता,त्यामुळे व्यापारी व व्यावसायिकांचा उद्योग अडचणी सापडला आहे. अनेक कामगारांची उपजीविका यावरच अवलंबून आहे.
व्यापारी व व्यवसायिकांच्या तक्रारी नंतर उपमहापौर गणेश भोसले यांनी तातडीने मनपा कोरोना दक्षता पथकातील अधिकारी व कर्मचार्‍यांची बैठकी घेऊन सूचना दिल्या यावेळी नगरसेवक प्रकाश भागानगरे, यंत्र अभियंता परिमल निकम,दक्षता प्रमुख शशिकांत नजन, जितेंद्र सारसर, नाना गोसावी,राहुल साबळे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment