कोणत्याही कार्यालयात मी कधीही येईल गैरहजर कर्मचार्‍यांवर कारवाई करेल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 10, 2021

कोणत्याही कार्यालयात मी कधीही येईल गैरहजर कर्मचार्‍यांवर कारवाई करेल

 कोणत्याही कार्यालयात मी कधीही येईल गैरहजर कर्मचार्‍यांवर कारवाई करेल

महापौरांनी घेतली कर्मचार्‍यांची झाडाझडती...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कर्मचार्‍यांनी कार्यालयात वेळेवर येवून कामकाज पाहावे नागरिकांना त्यांचे असलेल्या तक्रारी किंवा कामे वेळेत पूर्ण करावे. कोणत्याही कार्यालयात केव्हाही भेट देण्यात येईल. गैरहजर कर्मचा-यांवर कारवाई करण्यात येईल. प्रत्येक कर्मचारी व नागरिक यांनी मास्कचा वापर करावा. मनपाच्या कारभारात सुधारणा होण्याच्या दृष्टिने नागरिकांचे कामे वेळेवर पार पाडणे कामामध्ये सुसत्रता आणणे यासाठी प्रयत्नशील असल्याचे मत महापौर सौ.रोहिणी शेंडगे यांनी व्यक्त केले.
अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्र. 2 जुनी महानगरपालिका कार्यालय तसेच कौन्सील हॉलला आज सकाळी 10-00 वा. मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यांनी भेट दिली. कौन्सील हॉलची पाहणी केली असता मा.महापौर यांना जुन्या कार्यक्रमाच्या आठवणी झाल्या.कौन्सील हॉलचे नुतनीकरणाचे काम शहरातील नामांकित आर्किटेक्ट तसेच इंजिनिअर व स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून लवकरच हाती घेण्यासाठी माझ्या कार्यालयामध्ये मी मिटींग घेवून चर्चा करून काम सुरू करणार असे त्या म्हणाल्या.
यावेळी मालमत्ताकर विभागाची पाहणी केली. सदर विभागाच्या छताची आवस्था पाहली. तसेच त्या ठिकाणी वापरात न येणा-या बॅट-या हलविण्यास सांगितले. त्या विभागामध्ये मालमत्ता रेकॉर्ड जतन करण्याचे व आकारणी करण्याचे कामे सुरू असतात त्या विभागासाठी दोन कर्मचा-यांची मागणी केली. जुन्या मनपातील शौचालयाची अवस्था अत्यंत बिकट झाली असल्यामुळे तेथील महिलांसाठी स्वच्छतागृहाचे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. जन्म मृत्यू विभागास नागरिकांचे जन्म मृत्यू दाखले वेळेवर नोंदी करून घेणे तसेच दाखले देणे याबाबत सुचना दिल्या. आरोग्य विभागातील 2 कर्मचारी गैरहजर होते त्यांना प्रभागा अधिकारी श्री सिनारे यांनी खुलासा मागवावा असे सांगितले.
विवाह नोंदणी विभागात सुध्दा भेट देवून नागरिकांचे नोंदणीची कामे कमीत कमी वेळात पूर्ण करून दाखले देण्यात यावेत. आरसीएच विभागातील महिला कर्मचा-यांनी वेळेवर उपस्थित राहून आपले कामकाज नियमीतपणे पार पाडावे तसेच कामे पेंडीग ठेवू नये असेही त्या म्हणाल्या. कोर्ट विभागातील कर्मचारी शिपाई कर्मचारी गैरहजर आढळून आले. शहर वसुली विभागाची पाहणी केली.  जुन्या मनपाच्या आवाराची साफ सफाई वेळेवर करण्यास सांगितले. यापुढील काळात प्रत्येक कर्मचा-यांने आयकार्ड लावणे तसेच कामावर वेळेवर उपस्थित न राहिल्यास संबंधीत प्रभाग अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल. व कर्मचा-यांची बिनपगारी रजा करण्यात येईल असे मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यांनी सांगितले. यावेळी प्रभाग अधिकारी श्री.सिनारे, श्री.राजेंद्र नराल, श्री.किशोर कानडे, श्री.श्रेयश कुलकर्णी समवेत होते.

No comments:

Post a Comment