आ. निलेश लंकेंची केवळ सदिच्छा भेट- किरण काळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, August 10, 2021

आ. निलेश लंकेंची केवळ सदिच्छा भेट- किरण काळे

 आ. निलेश लंकेंची केवळ सदिच्छा भेट- किरण काळे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पारनेरचे आ.निलेश लंके यांची मी पारनेर परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीसाठी गेलो असता माझ्या सहकार्‍यां समवेत सदिच्छा भेट घेतली होती. ही भेट राजकीय स्वरूपाची नसून सदिच्छा भेट होती. या भेटीबाबत अनेक राजकीय स्वरूपाची चर्चा समाज माध्यमांमधून आणि इतर व्यासपीठांवरून सुरू आहे. या भेटीचा विपर्यास यातून झाल्याचे दिसते. आ. लंके यांना त्यांनी कोरोना काळात केलेल्या कामासाठी यावेळी शुभेच्छा दिल्या एवढेच या भेटीत घडले असा खुलासा शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे.  कुणाचे कुणाशी राजकीय मतभेद असतील तर हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. राजकारणात या गोष्टी सुरू असतात. नगर शहरात काम करत असताना राजकीय संघर्ष करण्यासाठी मी, माझे सहकारी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमच्या नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी सक्षम आहोत. नगर दक्षिणेत कुणाचे कुणाबरोबर काय चालू आहे यात आपल्याला रस नसून नगर शहरातील नागरी प्रश्नावर काम करण्याशी आमची बांधिलकी आहे. या भेटीचा निव्वळ राजकीय विपर्यास झाला असून या गोष्टीला मी फारसे महत्त्व देत नाही. इतर कोणी देखील ते देऊ नये, असे किरण काळे यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here