भिंगार कॅम्प गुन्ह्यातील आरोपीस, पोलीसासमोर गंभीर मारहाण. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, August 16, 2021

भिंगार कॅम्प गुन्ह्यातील आरोपीस, पोलीसासमोर गंभीर मारहाण.

 भिंगार कॅम्प गुन्ह्यातील आरोपीस, पोलीसासमोर गंभीर मारहाण.

पत्नीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल. आरोपी गंभीर जखमी...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेतल्या नंतर आरोपीला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीत सादीक बिराजदार गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणात रात्री सादिक बिराजदार यांची पत्नी रुक्सार सादीक बिराजदार यांच्या फिर्यादी वरून रात्री उशिरा वरिष्ठाच्या आदेशानुसार भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात रुक्सार सादीक बिराजदार यांनी फिर्याद दिली असून फिर्यादीत म्हटले आहे की काल रात्री संध्याकाळी 7.30 ते 8.00 वाजेचे दरम्यान मी माझे पती सादीक बिराजदार, माझी सासु हुरबानो लाडलेसाहब बिराजदार, दोन लहाण मुले असे आमचे घरी असतांना आमचे घराचे दार वाजवुन सादीक असा आवाज दिला तेव्हा माझे पती सादीक बिराजदार यांनी घराचा दरवाजा उघडला असता भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन चे दोन पोलीस होते. त्यांनी माझे पतीस त्यांचे सोबत पोलीस स्टेशनला येण्यास सांगितले. तेव्हा माझे पती त्यांचे सोबत घराचे खाली गेले तेव्हा मी घराचे बाहेरून बसवुन घेवुन गेले. त्यांचे सोबत असलेला आजीम उर्फ मुनीया सय्यद याने आमचे समोर कुणालातरी फोन लावुन रशीद, सादीक को पोलीस लेके जारी तुम आवो पिछेसे दंडे लेके असे म्हणाला व त्याचकडील मोटार सायकलवरुन तैथुन निघुन गेला. त्यानंतर मी माझी मामेसासु तसलीम शेख व माझे मामे सासरे रोशनमिय शेख असे तिघे लगेच रिक्षाने त्यांचे मागे पोलीस स्टेशनला येण्यासाठी निधालो.आम्ही भिंगार नाल्या जवळ येत असतांना पोलीसांची गाडी थांबली असल्याचे दिसले. त्यावेळी तेथे बाजुलाच एक रिक्षा सुद्धा त्या ठिकाणी थांबलेली दिसली व चार ते पाच लोक त्यात मुनीया उर्फ अजीम रसूल सय्यद, रशीद रसूल सय्यद, कुद्दुस रशीद सय्यद, मोईन मुनीया उर्फ अजीम सय्यद, अर्शद मुनीया उर्फ अजीम सय्यद सर्व रा. दर्गा दायरा, मुकुंदनगर, अहमदनगर . हे सादीक ला पोलीसांचे गाडीतुन बाहेर काढून लोखंडी रडने डोक्यात व इतर ठिकाणी मारहाण करतांना रोडचे लाईट चे उजेडात दिसले. त्यानंतर पोलिसांनी त्याला गाडीमध्ये बसून घेवुन गेले. मी नंतर सादीक बिराजदार यांना फोन केला तेव्हा  मैनुददीन पोलीस यांनी फोन उचलला व तुमच्या नव-याचा अपघात झाला असुन त्याला सिव्हील हॉस्पीटल नेत असले बाबत सांगितले. त्यानंतर आम्ही सिव्हील हस्पीटल येथे गेलो. सिव्हील हस्पीटल येथे गेलो असता माझे पती सादीक हे बेशुद्ध अवस्थेत होते व त्यांचे सिटीस्कन करुन त्यांना दुसर्‍या हस्पीटलमध्ये उपचारासाठी घेवुन जाण्यास सांगीतले म्हणुन आम्ही माझे पतीस मॅक्सकेअर हस्पीटल, झोपड़ी कर्टीन जवळ येथे नेवुन उपचासाठी अडमिट केले. असेही फिर्यादीत म्हटले आहे.

No comments:

Post a Comment