पिपल्स रिपब्लिकन पक्षाची जिल्हा व तालुका कार्यकारणी बरखास्त ः सुमेध गायकवाड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, August 14, 2021

पिपल्स रिपब्लिकन पक्षाची जिल्हा व तालुका कार्यकारणी बरखास्त ः सुमेध गायकवाड

 पिपल्स रिपब्लिकन पक्षाची जिल्हा व तालुका कार्यकारणी बरखास्त ः सुमेध गायकवाड


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः पिपल्स रिपब्लीकन पक्षाचे अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांच्या आदेशानुसार व जयदिपभाई कवाडे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या अहमदनगर जिल्हयाध्यक्षपदी सुमेध गायकवाड यांची निवड झाली. निवड झाल्यानंतर सुमेध गायकवाड यांनी प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांच्या आदेशान्वये अहमदनगर जिल्हयातील सर्व जिल्हा कार्यकारणी, तालुका कार्यकारणी बरखास्त करीत असल्याची घोषणा पक्षाच्या जेष्ठ नेत्याच्या मान्यतेने केली आहे.
लवकरच जिल्ह्याची व तालुक्याची नवीन कार्यकारणी घोषित केली जाणार असल्याचे देखील त्यांनी म्हंटले आहे. तरी इच्छुक भिमसैनिकांनी संपर्क साधावा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड, महिला जिल्हाध्यक्ष गौतमीताई भिंगारदिवे, गौतमी भिंगारदिवे , महेश भोसले ,विशाल गायकवाड़ ,रऊफ कुरैशी ,सिद्धांत गायकवाड़ ,अक्षय बोरुडे ,विजय वडगले ,तेजस गायकवाड़ ,स्वप्निल गायकवाड़ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment