राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, August 9, 2021

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

 राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, फुले ब्रिगेडचे शहराध्यक्ष दिपक खेडकर, अशिष भगत, किरण जावळे, आकाश डागवाले, गणेश शेलार, चेतन शेलार, रविराज काळे, रामेश्वर कातखडे, गणेश बोरुडे, बाळासाहेब मुदगल, विकास गीते, मळू गाडळकर, ओंमकार घोलप, बाळासाहेब पवार, सतिष ताठे, बाळासाहेब गंगेकर, संतोष ढाकणे आदी उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, संत सावता महाराजांनी खरा भक्ती मार्ग दाखविला. भगवंत व भक्ताचे नाते त्यांनी आपल्या भक्तीतून उलगडले. निस्सीम विठ्ठल भक्तीने त्यांनी भक्तिभावनेचा मळा फुलविला. मळ्यातील भाजीपाल्यामध्येही त्यांनी विठ्ठलाचे रुप पाहिले. आपले काम व भक्ती प्रती आस्थेची शिकवण त्यांच्या विचारातून मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कांदा, मुळ्याची शेती फुलवून खरा भक्ती मार्ग दाखविणारे सावता महाराजांचे कार्य आभाळा एवढे उंचीचे आहे. या संकटकाळात व धावपळीच्या जीवनात त्यांचे विचार भक्ती मार्गाने जाण्याची प्रेरणा देत असल्याचे प्रा. माणिक विधाते यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment