नेत्रसेवक बबनराव शेळके यांचे कार्य कौतुकास्पद-हरिभाऊ कर्डिले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, August 9, 2021

नेत्रसेवक बबनराव शेळके यांचे कार्य कौतुकास्पद-हरिभाऊ कर्डिले

 नेत्रसेवक बबनराव शेळके यांचे कार्य कौतुकास्पद-हरिभाऊ कर्डिले


नगरी दवंडी/वार्ताहर
चिचोंडी पाटील ः नगर तालुक्यातील चिचोंडी पाटिल येथे बबनराव शेळके मित्रमंडळ आयोजित 234 वे के.के.आय (बुद्रानी) हॉस्पिटल  पुणे व भाजपा किसान मोर्चा अहमदनगर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.6/8/2021 रोजी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन नगर तालुका मार्केट कमिटीचे संचालक हरिभाऊ कर्डिले साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य पती ज्ञानेश्वर ठोंबरे होते.कोरोना महामारी सारख्या रोगाला न जुमानता, सर्वसामान्य गोरगरीब नेत्रहीन  वयोवृद्धांसाठी जिवाची पर्वा न करता मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करून या वृद्धांना एक प्रकारे नेत्र, दृष्टी देण्याचे कार्य नेत्रसेवक बबनराव शेळके यांनी केले आहे.
आजच्या युगात काही मुलं स्वतःच्या आई वडीलांना सांभाळत नाहीत,एवढी काळजी आज शेळके यांनी घेतली आहे. त्यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे असे उद्गार उद्घाटन प्रसंगी हरिभाऊ कर्डिले यांनी काढले, या शिबिराचा नगर, आष्टी, पाथर्डी तालुक्यातील 70 नेत्र रुग्णांनी लाभ घेतला. बलभीम बाबुराव जाधव या ज्येष्ठ नागरिकांची नेत्र तपासणी करून शिबिराची सुरुवात करण्यात आली. यातील 35नेत्र रुग्णांवर पुण्याच्या के,के हॉस्पिटल येथे नेत्र शस्त्रक्रिया होणार आहे. शिबिर यशस्वितेसाठी शिबिर आयोजक बबनराव शेळके, अनिल शेलार, पत्रकार सोहेल मनियार, मुस्तफा मनियार सर, अब्रार सय्यद, दत्तात्रय कोकाटे, बलभीम जाधव, अनिल बोरुडे, आबासाहेब वाडेकर,गणेश इंगळे, संभाजी खडके, प्रकाश तनपुरे, मीरा पठारे, मनीषा कोरडे आशिद शेख तसेच संगम तरुण मंडळ यांनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment