सीना नदीवरील पुलाच्या कामासाठी लवकरच निधी उपलब्ध करून देणार - खा.डॉ.सुजय विखे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, August 9, 2021

सीना नदीवरील पुलाच्या कामासाठी लवकरच निधी उपलब्ध करून देणार - खा.डॉ.सुजय विखे

 सीना नदीवरील पुलाच्या कामासाठी लवकरच निधी उपलब्ध करून देणार - खा.डॉ.सुजय विखे

खा.डॉ.सुजय विखे व आ.संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत कल्याण रोडच्या कामाचा शुभारंभ


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कल्याण रोड हा राष्ट्रीय महामार्ग असून या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात रहदारी व वाहतूक सुरू आहे. अनेक वर्षांपासून कल्याण रोडची परिस्थिती बिकट झाली होती यासाठी मी व आ.संग्राम जगताप यांनी पाठपुरावा करून या रस्त्यासाठी 35 कोटी रुपयांचा निधी मंजूर असून उदया पासून या कामाला सुरवात होणार आहे. हे काम कल्याण रोड बायपास ते नेप्ती नाका ते सक्कर चौकापर्यंत असणार आहे. सुमारे 35 कोटी रुपये खर्च करून हे काम होणार आहे यामध्ये नेप्ती नाका ते आयुर्वेद कॉर्नर पर्यंत रस्ता काँक्रिटीकरण, साईट गटार व पेंविंग ब्लॉगचे काम होणार कारण संपूर्ण शहराचे पावसाचे पाणी या रस्त्यावरून वाहत असते व त्यामुळे वारंवार रस्ता खराब होत असतो, यासाठी काँक्रिटीकरनाचे काम हाती घेतले आहे. कल्याण रोड वरील रेल्वे उड्डाण पुला पासून ते नेप्ती नाक्यापर्यंत साईट गटार व डांबरीकरणाचे काम होणार आहे. लवकरच सीना नदी वरील पुलाच्या कामाला 12.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणून हे काम पूर्ण करू असे प्रतिपादन खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.
नगर-कल्याण रोड राष्ट्रीय महामार्गावरील बायपास चौक ते नेप्ती नाका ते सरकार चौकापर्यंतच्या रस्त्याच्या कामाची पाहणी करून शुभारंभ करताना खा.डॉ. सुजय विखे पाटील, समवेत आ.संग्राम जगताप, उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक पै.सुभाष लोंढे, नगरसेवक मनोज कोतकर, मा.नगरसेवक धनंजय जाधव, नगरसेवक मनोज कोतकर, नगरसेवक राहुल कांबळे, अजय चितळे, संभाजी पवार, गणेश नन्नवरे, संतोष ढाकणे, संतोष लांडे, वैभव वाघ, वैभव ढाकणे, मळू गडाळकर, ओंकार घोलप तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आ.संग्राम जगताप पुढे म्हणाले की,या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. हा रस्ता  राष्ट्रीय महामार्ग असून शहरातून जात आहे. या रस्त्याचे काम व्हावे यासाठी खा.सुजय विखे पाटील व मी या रस्त्याच्या कामाच्या निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला हा रस्ता दर्जेदार व नियोजन पद्धतीने केला जाणार आहे त्यामुळे शहराच्या विकासात व वैभवात हा रस्ता भर पडेल असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment