कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लॅन्टचे पालकमंत्री हसन मुश्रीफांचे हस्ते उद्घाटन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, August 14, 2021

कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लॅन्टचे पालकमंत्री हसन मुश्रीफांचे हस्ते उद्घाटन.

 कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लॅन्टचे पालकमंत्री हसन मुश्रीफांचे हस्ते उद्घाटन.

नगर जिल्ह्यातील पहिलचा ऑक्सीजन प्लांट.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
कर्जत ः कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालय याठिकाणी ऑक्सिजन प्लॅन्टची उभारणी करण्यात आली असून जिल्हा नियोजन मधून उभारलेल्या या प्लॅन्टसाठी आ रोहित पवार यांनी विशेष प्रयत्न केले होते. आज सकाळी साडेनऊ वाजता पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे हस्ते या ऑक्सिजन प्लॅन्टचे उद्घाटन सम्पन्न झाले. अहमदनगर जिल्ह्यातील हा पहिलाच ऑक्सिजन प्लॅन्ट असून आगामी काळात कोरोनाच्या परिस्थितीत ऑक्सिजन हा महत्वाचा घटक ठरणार असून तो येथे उपलब्ध होत असल्याने त्याचा नक्कीच लाभ रुग्णांना होणार आहे असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
प्रथम उपजिल्हा रुग्णालयात उभारलेल्या ऑपरेशन थिएटरचे ही उदघाटन करून मुश्रीफ यांनी त्याची पाहणी केली यावेळी आ. रोहित पवार, जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी क्षीरसागर आदी सह मोठ्या संख्येने अधिकारी, पदाधिकारी व आरोग्य कर्माचारी उपस्थित होते यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment