आजच्या युवा पिढीने कै.बलभीम डोके यांचे कार्य आत्मसात करावे- राज्यमंत्री आदिती तटकरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, August 30, 2021

आजच्या युवा पिढीने कै.बलभीम डोके यांचे कार्य आत्मसात करावे- राज्यमंत्री आदिती तटकरे

 आजच्या युवा पिढीने कै.बलभीम डोके यांचे कार्य आत्मसात करावे- राज्यमंत्री आदिती तटकरे

वनश्री कै. बलभीम डोके पाटील यांचे प्रेमदान चौक ते प्रोफेसर कॉलनी चौकापर्यंतच्या रस्त्याचे नामकरण


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः वनश्री कै.बलभीम डोके पाटील यांनी आपल्या कृतीतून वृक्षारोपण व संवर्धन करून निसर्गावरचे प्रेम समाजामध्ये सिद्ध केले.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व त्याचे संवर्धन ही काळाची खरी गरज आहे. वनश्री बलभीम डोके पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य वृक्षारोपण व संवर्धनासाठी खर्च केले याचीच दखल महाराष्ट्र शासनाने घेऊन त्यांना ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री’ पुरस्काराने सन्मानित केले. समाजामध्ये त्यांनी वृक्षारोपण व संवर्धनाचे महत्त्व जनजागृती मधून पटवून दिले त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे त्यांचा आदर्श आजच्या युवा पिढीने अंगीकारून वृक्षारोपण व संवर्धनाची चळवळ हाती घ्यावी असे प्रतिपादन पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले.
वनश्री कै. बलभीम डोके पाटील यांचे प्रेमदान चौक ते प्रोफेसर कॉलनी चौका पर्यंतच्या रस्त्याच्या नामकरणाचा शुभारंभ पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी आ. संग्राम जगताप, अ‍ॅड.शिवजीत डोके, अ‍ॅड. प्रसाद डोके, रेखा डोके, दीपाली डोके, मनपा विरोधी पक्षनेता संपत बारस्कार, नगरसेवक कुमारसिंह वाकळे, बाळासाहेब पवार, प्रा.माणिकराव विधाते, बाळासाहेब जगताप, राजेंद्र चोपडा, सूर्यकांत गाडे, दिलीप मिस्कीन, अमोल गाडे, धनंजय गाडे, उदय मिस्कीन, जितेंद्र गाडे, विजय निक्रड, संजय गाडे, छायाताई निक्रड, अभयसिंह डोके, अमरसिंह डोके, पुनम डोके, उत्कर्षा डोके आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ.संग्राम जगताप म्हणाले की, कै.बलभीम अण्णा डोके हे आजच्या युवा पिढीसमोर एक आदर्श व्यक्तिमत्व आहे त्यांनी आयुष्यभर वृक्षारोपण व संवर्धनासाठी काम केले आहे. आजच्या युवा पिढीला त्यांचे नाव व त्यांचे कार्य स्मरणात राहावे यासाठी प्रेमदान चौक ते प्रोफेसर चौका पर्यातच्या मार्गाला वनश्री कै.बलभीम अण्णा डोके यांचे नाव देण्यात आले आहे. कोरोनाच्या काळामध्ये वृक्षाबद्दल चे महत्व संपूर्ण देशासमोर अधोरेखित झाले आहे. वृक्षाच्या माध्यमातून मोफत शुद्ध प्राणवायू मिळण्याचे काम होत आहे. अहमदनगर महानगरपालिकेने वनश्री ढोके यांचा आदर्श बाळगून शहरांमध्ये सुमारे 5000 वृक्ष लावण्याचा संकल्प हाती घेतला आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना अ‍ॅड. शिवजीत डोके म्हणले की, आमचे वडील अण्णा समाजामध्ये वावरत असताना नेहमीच वृक्षाचे महत्त्व नागरिकांना पटवून देत होते. त्यांचे वृक्षावर असणारे प्रेम आम्ही जवळून पाहत होतो आ. संग्राम जगताप अहमदनगर मनपाने आमच्या वडिलांचे नाव रस्त्याला दिले आहे त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. अण्णांचे विचार व कार्य आम्ही डोके परिवार यापुढे समाजामध्ये नेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment