नागरिकांचे विकासात्मक प्रश्न मार्गी लावणे हाच एकमेव अजेंठा- आ.संग्राम जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, August 30, 2021

नागरिकांचे विकासात्मक प्रश्न मार्गी लावणे हाच एकमेव अजेंठा- आ.संग्राम जगताप

 नागरिकांचे विकासात्मक प्रश्न मार्गी लावणे हाच एकमेव अजेंठा- आ.संग्राम जगताप

टिळक रोड वर पटेल मंगल कार्यालय परिसरात रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहर विकासाच्या प्रश्नाबरोबरच कॉलन्या अंतर्गत नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.स्वच्छ,सूंदर व हरित नगर करण्यासाठी मूलभूत प्रश्न सोडविणे गरजेचे आहे यासाठी विविध उपाययोजना करत आहोत नागरिकांच्या सहकार्याने विकास कामे मार्गी लागत आहे.पटेल मंगल कार्यालय परिसरातील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम मार्गी लावले आहे तसेच याभागतील महिलांनी ओपन स्पेसच्या सुशोभीकरणाच्या
कामाची मागणी केली असून ते काम लवकरच मार्गी लागणार आहे. याच बरोबर केतकर हॉस्पिटल समोरील रस्त्याचे कामही सुरू करू.शहर व उपनगरातील सर्व भागांमध्ये समांतर विकास कामे व्हावी यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला जात आहे. नागरिकांचे विकासाचे प्रश्न मार्गी लागणे हाच एकमेव अजंठा आहे असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

टिळक रोडवरील पटेल मंगल कार्यालय परिसरात रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी प्रा.माणिकराव विधाते, नंदू एकाडे, राजेंद्र ससे, इंजि.गणेश गडाळकर, जिग्नेश शहा, राजेंद्र पटेल, नितीन शिंगवी, शुभम पडोळे, प्रकाश अकोलकर, सागर कुक्कडवाल, आविनाश पटेल, पंकज पटेल, इकबाल शेख, राकेश गांधी, भाऊ उरने, सुषमा पडोळे, सुवर्ण एकाडे, सीमा एकाडे, डिंपल शहा, संजीवनी मेहरवल, अंबादास चौधरी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नितीन शिंगवी म्हणले की, या भागाचा रस्त्याचा अनेक वर्षाचा प्रश्न आ.संग्राम जगताप यांनी मार्गी लावला आहे. वैयक्तिक प्रश्नांबरोबरच विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. आ.संग्राम जगताप यांच्यामुळे शहरातील विविध विकास कामे दर्जेदार पद्धतीचे सुरू आहे.त्यामुळेच शहराच्या विकासात भर पडत असून शहर लवकरच महानगराकडे वाटचाल करत आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment