डॉ. दीपक आहेर कोरोना रुग्णांसाठी आधार..! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, August 30, 2021

डॉ. दीपक आहेर कोरोना रुग्णांसाठी आधार..!

 डॉ. दीपक आहेर कोरोना रुग्णांसाठी आधार..!


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत आपल्या अस्तित्वाची ओळख जगाला करून देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असलेले जुन्नर तालुक्यात पठार भागावरील अणे या आपल्या गावी आरोग्य सेवेचे काम सुरू करून ग्रामीण भागातील समाजाची गेल्या पंधरा वर्षापासून सेवा करत असलेले डॉ. दीपक लक्ष्मण आहेर हे खरे एक सामाजिक व्यक्तिमत्त्व असून ते एक समाज नेतृत्व आहेत.
पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या  घाटावरील माळरानावर त्यांनी सुरु केलेले  मातोश्री शैक्षणिक संकुल त्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध झाली.  जमिनीवर उभे राहून नेहमी काम करणारे डॉ. दीपक आहेर हे आज समाजातील प्रत्येक गोरगरीब व्यक्तिला आपल्यातले वाटतात.
आरोग्यसेवा व शिक्षण व्यवस्था यामध्ये काम करत असताना डॉ. दीपक आहेर यांनी नेहमी समाजातील गोरगरीब जनता व सर्वसामान्य विद्यार्थी यांना केंद्रबिंदू ठेवूनच काम केले असल्याचे दिसते. डॉ. दीपक  आहेर  हे आपल्या जीवनात आई वडिलांनाच आपले मार्गदर्शक व गुरु मानतात त्यांनी सामाजिक कामाची प्रेरणा त्यांच्यापासूनच घेतल्याचे डॉ. आहेर यांच्या जवळ गेल्यावर लक्षात येते. आपल्या कुटुंबाला व समाजाला पुढे घेऊन जात असताना डॉ. दीपक अहेर यांना त्यांचे लहान बंधू किरण आहेर यांची मोलाची साथ आहे. आपल्या अणे गावांमध्ये ग्रामस्तरावर काम करत असताना डॉ. दीपक आहेर यांनी गावच्या विकासासाठी व गावाला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी नेहमीच प्रयत्न केलेला आहे.
कोरोना काळात  पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यासोबत काम करत असताना पहिल्या लाटेमध्ये आपल्या मातोश्री शैक्षणिक संकुल व मातोश्री हॉस्पिटलची संपूर्ण इमारतच त्यांनी  आमदार लंके यांना एक हजार बेडच्या श्री शरदचंद्रजी पवार साहेब कोरोना सेंटर साठी मोफत दिली. डॉ. दीपक आहेर यांनी कोरोना काळात केलेले काम निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांनी कोणताही स्वार्थ न ठेवता कोरोना रुग्णांना मोफत व  अत्यल्प दरात कशा पद्धतीने उपचार मिळतील याचाच नेहमी विचार केला.
आता कर्जुले हर्या येथे डॉ. दीपक आहेर यांनी आपल्या मातोश्री हॉस्पिटलच्या माध्यमातून ते कोरोना रुग्णांची व इतर रुग्णांची सेवा करत आहे. त्यांनी मातोश्री हॉस्पिटल हे अत्याधुनिक पद्धतीने कार्यरत केले असून त्या माध्यमातून ते पारनेर जुन्नर व संगमनेर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची रुग्णसेवा करत आहेत.
डॉ. दीपक आहेर हे कोरोना रुग्णांना खर्‍या अर्थाने मानसिक आधार देत त्यांच्यावर उपचार करत आहेत. कोरोना रुग्णांनीची ते  घेत असलेली काळजी त्यामुळे डॉ. दीपक आहेर याच्याबद्दल रुग्णांनाही आता प्रेम व आदरभाव निर्माण होतो आहे.
समाजात राहून खर्‍या अर्थाने समाजाची सेवा केली पाहिजे ही मानसिकता मनात ठेवून डॉ. दीपक आहेर हे समाजातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेची जी सेवा करत आहेत ती खरोखर वाखाण्याजोगी आहे.  सर्वसामान्य जनतेला आधार देऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणे आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे  शेतकर्‍यांच्या कष्टकर्‍यांच्या विद्यार्थ्यांना  अल्पदरात शिक्षण मिळाले पाहिजे हीच भावना मनात ठेवून डॉ. आहेर हे समाज व्यवस्थेमध्ये काम करत आहेत. डॉ. दीपक आहेर हे आरोग्य  व्यवस्था व शिक्षण व्यवस्थेचे एक  सामाजिक विद्यापीठच आहे.  अशा या हसमुख असलेल्या व  सामान्य जनतेचा विचार करणार्‍या व्यक्तिमत्वास  निश्चित भविष्यामध्ये चांगले काम करण्याची प्रेरणा मिळत राहो.

मातोश्री हॉस्पिटल कर्जुले हर्या येथे उपचार घेत असताना डॉ. दीपक आहेर यांनी मला जो मानसिक आधार दिला तसेच योग्य ते  अल्पदरात उपचार केले  यामुळे कोरणा-या आजारातून मी खर्‍या अर्थाने पूर्ण बरा झालो डॉ. आहेर यांनी केलेले माझ्यावर उपकार मी कधीही विसरणार नाही.
- राजेंद्र रोकडे मातोश्री हॉस्पिटल येथे उपचार घेतलेला रुग्ण

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here