आनंद कोचिंग क्लासेसच्या चार विद्यार्थ्यांची चार लाखाच्या इन्स्पायर स्कॉलरशिपसाठी निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 24, 2021

आनंद कोचिंग क्लासेसच्या चार विद्यार्थ्यांची चार लाखाच्या इन्स्पायर स्कॉलरशिपसाठी निवड

 आनंद कोचिंग क्लासेसच्या चार विद्यार्थ्यांची चार लाखाच्या इन्स्पायर स्कॉलरशिपसाठी निवड

आनंद कोचिंग क्लासेसचा जगभरात डंका...

नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः भारत सरकार दरवर्षी इयत्ता बारावी पास होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी बारावीच्या गुणांच्या आधारे इन्स्पायर स्कॉलरशिप देत असते. या स्कॉलरशिपसाठी आनंद कोचिंग क्लासेसच्या चार विद्यार्थ्यांची निवड झाली.
निवड झालेल्यांमध्ये 1)कुमार ज्ञानेश्वर सयाजी खरमाळे बारावी मध्ये 96.83%  गुण ,2) कुमारी वेदश्री गंगाधर भालेराव बारावी मध्ये 96.83%,  3) कुमारी ऋतुजा संतोष औटी बारावी मध्ये 96% गुण,4) कुमार आयन जहांगीर सय्यद बारावी मध्ये 95. 63% यांचा समावेश आहे.
हे सर्व विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या यापुढील शिक्षणासाठी दरवर्षी 80,000 याप्रमाणे पुढील पाच वर्ष एकूण चार लाख स्कॉलरशिपच्या रूपाने मिळणार आहेत. या चार विद्यार्थ्यांना प्राध्यापक सचिन गाडगे सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. स्वतः सचिन गाडगे सर बीएससी फिजिक्स आणि एम एस सी फिजिक्स यामध्ये गोल्ड मेडलिस्ट आहेत परदेशात जाण्याचे अनेक संधी असताना देखील ग्रामीण भागातील मुलांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही म्हणून त्यांनी पारनेर सारख्या ग्रामीण भागामध्ये आनंद कोचिंग क्लासेस ची सुरुवात केली. सुरुवातीच्या काळामध्ये अनेक जणांकडून त्यांच्या या निर्णयाची अनेकांनी खिल्ली उडवली होती, आज असंख्य विद्यार्थी हे अधिकारी झाले आहेत,असंख्य विद्यार्थी अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करत आहेत, काही जण परदेशामध्ये काम करत आहेत या शिवाय नौसेना, वायुदल आणि आर्मी च्या रूपाने अनेक जण देश सेवा करत आहेत. भविष्यामध्ये गोरगरीब शेतकरी, कष्टकरी, मजूर यांच्या मुलांसाठी मोफत निवासी ज्युनियर कॉलेजची स्थापना करण्याचा मानस आहे जेणेकरून पैशा अभावी कुठलाच गरीबाचा मुलगा शिक्षणापासून वंचित राहू नये. सर्व स्तरावरून या चारही विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment