महाराष्ट्रातील आगळावेगळे रक्षाबंधन नेवाशामध्ये साजरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 24, 2021

महाराष्ट्रातील आगळावेगळे रक्षाबंधन नेवाशामध्ये साजरे

 महाराष्ट्रातील आगळावेगळे रक्षाबंधन नेवाशामध्ये साजरे

एकल महिला पुनर्वसन समितीचा उपक्रम


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः कोरोनामुळे विधवा झालेल्या 16 महिलांसाठी महाराष्ट्रातील पहिला  आगळावेगळा  रक्षाबंधन चा कार्यक्रम एकल महिला पुनर्वसन समिती व शारदा फाउंडेशन यांनी आयोजित केला होता. हा कार्यक्रम दिनांक 22 रोजी एडीसीसी बँक मार्केट यार्ड शाखाच्या सभागृहात उत्कृष्ट पद्धतीने पार पडला.
नेवासा तालुक्यात आज अगदी वेगळ्या पद्धतीने हा रक्षाबंधन कार्यक्रम झाला. कोरोनामुळे ज्या महिला यांचे पती गेले अशा महिलां  भगिनी मार्फत उपस्थित मान्यवरांना राखी बांधण्यात आल्या.  शारदा फाउंडेशनच्या वतीने सर्व महिलांना साडी भेट देण्यात आली. ज्या महिला कार्यक्रमास येऊ शकल्या नाही त्यांनाही लवकर साडी व इतर सविस्तर मार्गदर्शन देण्यात येणार आहे. विचार मंचावर या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी नेवासा पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे पाटील, उपसभापती किशोर जोजार, पुनर्वसन समितीचे जिल्हा समन्वयक अशोक कुटे, तालुका समन्वयक कारभारी गरड, शिक्षक समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर नरसाळे, बचत गटाचे मार्गदर्शक अरुण वल्ले सर, पत्रकार संदीप गाडेकर, रमेश शिंदे, जयश्री कुटे मॅडम हे मान्यवर उपस्थित होते. प्रसिद्ध शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी सरांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभर ही चळवळ सुरु झाली आहे.
कविता जाधव, जया आढाव या महिलांनी आपल्या मनोगतात महिलांच्या वतीने अडचणी मांडल्या व नोकरीची गरज असल्याचे सांगितले. सभापती रावसाहेब कांगुणे यांनी लवकरच तालुकास्तरावर  शासकीय अधिकार्यांची एकत्रित मीटिंग घेऊन  पुढील नियोजन करण्याचे आश्वासन दिले.
उपसभापती किशोर जोजार यांनी संवेदनशील विषय हाती घेतल्याबद्दल पुनर्वसन  समितीचे कार्यक्रमाबद्दल कौतुक केले. जिल्हा समन्वयक अशोक कुटे सर यांनी प्रास्ताविक करताना एकल महिला पुनर्वसन समितीच्या कार्याचा आढावा मांडला व भविष्यातील नियोजन  सांगितले. तालुका समन्वयक कारभारी गरड यांनी बाल संगोपन योजना, संजय गांधी निराधार योजना, फी माफीचा  प्रस्ताव याबद्दल माहिती दिली. सदर कार्यक्रमासाठी माजी सभापती सुनीताताई गडाख यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. यावेळी भास्कर नरसाळे, अरुण वल्ले सर यांनीही बचत गटा बद्दल सविस्तर माहिती दिली . शेवटी महिलांची अभ्यासपूर्ण बैठक घेऊन त्यामध्ये समितीच्या वतीने विविध योजनाची सविस्तर माहिती दिली. बाल संगोपन व संजय गांधी निराधार योजनेचे कॅम्प आयोजित करणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतीश दादा निपुंगे, सुप्रिया झिंजुर्डे मॅडम,भारत आरगडे, विकास बोर्डे, अरुण वल्ले, गणेश लांडे, आप्पासाहेब वाबळे, शितल झरेकर, तिजोरे मॅडम, सुनीता नंदकुमार जोशी, सोमनाथ गायकवाड, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तंत्रस्नेही शिक्षक राहुल आठरे सर यांनी केले. आभार भारत आरगडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment