लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे - सागर खरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 3, 2021

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे - सागर खरे

 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे - सागर खरे

सॅनिटाझर व मास्क वाटप लोकशाहीर अण्णा भाऊ साठे युवक संघटनेचा उपक्रम


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः तळागाळातील जनतेसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संघर्ष केला. अण्णाभाऊंचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील आणि मराठी साहित्य क्षेत्रातील योगदान मोलाचे आहे.  शोषित समाजात निर्माण केलेली जागृती ही समाज परिवर्तनासाठी नंदी ठरली आहे. समाजातील दु:ख आपल्या साहित्य, शाहिरी, पोवाडे यातून मांडून जनजागृती केली. त्यांचे कार्य तत्कालीन समाज व्यवस्था बदलण्यासाठी प्रेरक ठरले आहे. आजही ते मार्गदर्शक असेच आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनकार्याची दखल घेऊन शासनाने त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशी समस्त समाजाची मागणी आहे, असे प्रतिपादन सागर खरे यांनी केले.
साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीचा कार्यक्रम लोकशाहीर अण्णा भाऊ साठे युवक संघटनेच्या वतीने भिंगार येथे संपन्न झाला. प्रथमतः लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  याप्रसंगी सागर खरे, नाना घडसिंग, रोहित पाटोळे,अवि साळवे, गंगाधर घडसिंग, श्याम लोखंडे, सनी घडसिंग, सचिन घडसिंग,योगेश घडसिंग, अमित घडसिंग, राहुल काळे, मल्हारी साळवे,ज्ञानेश्वर घोरपडे, अमोल घडसिंग, विशाल घडसिंग,तुषार राजगुरू आदींसह मंडळाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी  गंगाधर घडसिंग म्हणाले,  अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या साहित्याचा प्रचार होणे गरजेचे असून युवकांनी वाचन करावे. कोरोनाच्या महामारीच्या संकटसमयी अण्णाभाऊ साठे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गरिबांना आधार देण्याची गरज आहे. म्हणूनच संघटनेच्यावतीने जयंतीच्या निमित्ताने सॅनिटाझर व मास्क चे वाटप करण्यात आले आहे, त्याचा आदर्श इतरांनी घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment