‘जय बजरंग मॉर्निंग ग्रुप’तर्फे लांडे व वाळेकर यांचा सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 3, 2021

‘जय बजरंग मॉर्निंग ग्रुप’तर्फे लांडे व वाळेकर यांचा सत्कार

 ‘जय बजरंग मॉर्निंग ग्रुप’तर्फे लांडे व वाळेकर यांचा सत्कार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः नालेगाव येथील जय बजरंग मोर्निंग ग्रुप तर्फे इंडियन ओवरसीज बँक भिंगार शाखेचे कॅशियर रघुनाथ लांडे व मनपाचे मार्केट विभाग प्रमुख रमेश राव वाळेकर हे दोघेही आपल्या सर्विस मधून नुकतेच सेवानिवृत्त झाले त्याबद्दल नालेगाव जय बजरंग ग्रुप तर्फे रघुनाथ लांडे यांचा सत्कार मनी पहिलवान शिंदे व रमेश वाळेकर यांचा सत्कार प्रभाकर वाघमारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभाकर वाघमारे होते व कार्यक्रमाचे प्रस्ताविक दिनकरराव आगाऊ गुरुजी यांनी केले सत्कारमूर्ती रघुनाथ लांडे व रमेश वाळेकर यांना भावी आयुष्य आनंदी सुख समाधानाचे व दीर्घ उदंड आयुष्य लाभो आशा त्यांना शुभेच्छा दिल्या. 

दिनकरराव आगाऊ गुरुजी प्रभाकर वाघमारे तांबडे साहेब सेवानिवृत्त पीएसआय शिवाजी गुंजाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास भाऊसाहेब देवगडे, पहिलवान शिंदे, कानिफनाथ शिंदे, गोवर्धन नळकांडे, विजय लांडे, प्रकाश तांबोळी, सागर ठोंबरे, शिवा लांडे हजर होते कार्यक्रमाच्या शेवटी भाऊसाहेब देवगडे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment