पारनेर ग्रामीण पतसंस्थेवर दिवसाढवळ्या दरोडा..... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, August 7, 2021

पारनेर ग्रामीण पतसंस्थेवर दिवसाढवळ्या दरोडा.....

 पारनेर ग्रामीण पतसंस्थेवर दिवसाढवळ्या दरोडा.....

गोळीबार करून पाच लाख सोळा हजार घेऊन पुण्याच्या दिशेने हल्लेखोरांणचा पोबारा..

शाखाधिकारी बाळासाहेब सोनवणे गंभीर जखमी...



नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

अहमदनगर-पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा येथे असलेल्या पारनेर ग्रामीण पतसंस्थेच्या शाखेवर गोळीबार करीत अज्ञात दरोडेखोराने सुमारे ५ लाख१६ हजार रुपयांची रोकड भरदिवसा लुटूण्याची घटना शनिवार दि. ७ आँगस्ट रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.

   हल्लेखोरास विरोध करणारे शाखाधिकारी बाळासाहेब सोनवणे यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून छातीच्या खाली गोळी लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.


जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या पारनेर ग्रामीण पतसंस्थेची नगर-पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा येथे शाखा आहे. शाखा व्यवस्थापक बाळासाहेब सोनवणे हे दुपारी तीन वाजेच्या सुमारास शाखेबाहेर गेले असता पाळत ठेऊन असलेल्या दरोडेखोराने शाखेत प्रवेश केला.

रोखपाल महिलेवर रिव्हॉल्व्हर रोखून तिच्या जवळील सुमारे ५ लाख १६ हजार रुपयांची रोकड हस्तगत केली. दरम्यानच्या काळात शाखाधिकारी सोनवणे शाखेत पोहचले त्यांनी दरोडेखोरास झाडूने मारहाण करण्याचा प्रयत्न सुरुवातीस केला असता दरोडेखोराने त्यांच्यावर गोळीबार केला. व रोख रक्कम पाच लाख सोळा हजार घेऊन आपली मोटारसयकल होंडा शाईन घेऊन पुण्याच्या दिशेने पोबारा केला असुन लुटमार व गोळीबार सी.सी.टि.व्हीत स्पष्ट दिसत आहे .

घटनेची माहिती कळताच जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक नितीनकुमार गोकावे साह्यक पी. आय पवार साहेब साह्यक निरिक्षक मनोज मुढे खंडेराव शिंदे यांनी घटना स्थळी भेट दिली व सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे लुटारुचा शोध घेतला जात आहे. यासाठी काही पथके बनवून विविध ठिकाणी रवाना केले आहेत. लुटारु पैसे चोरताना व गोळीबार करताना सी,सी.टि.व्हीत स्पष्ट दिसत आसून पोलिसांनी विविध ठिकाणी नाकेबंदी कर पथके रवाना केली आहे.

No comments:

Post a Comment