गाव निर्मळ व स्वच्छ झाल्यास रोगमुक्त होणार- सरपंच अर्चना कुलट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 18, 2021

गाव निर्मळ व स्वच्छ झाल्यास रोगमुक्त होणार- सरपंच अर्चना कुलट

 गाव निर्मळ व स्वच्छ झाल्यास रोगमुक्त होणार- सरपंच अर्चना कुल

नेहरू युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने बुरुडगावला स्वच्छता अभियान


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता पाळणे आवश्यक असून, गाव निर्मळ व स्वच्छ झाल्यास रोगमुक्त होणार आहे. अस्वच्छतेने साथीचे आजार पसरत असल्याने नागरिकांनी घराबरोबरच परिसरातील स्वच्छतेला महत्त्व देण्याची गरज निर्माण झाली आहे. गावे स्वच्छ व कचरामुक्त झाल्यास ग्रामस्थांना निरोगी व प्रसन्न वातावरण मिळणार असल्याची भावना बुरुडगावचे सरपंच अर्चना कुलट यांनी व्यक्त केली.
नेहरू युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने स्वच्छता पंधरवडा अंतर्गत बुरुडगाव (ता. नगर) येथे स्वच्छता अभियान राबवून ग्रामस्थांमध्ये सार्वजनिक स्वच्छतेबद्दल जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच कुलट बोलत होत्या. यावेळी उपसरपंच रियाज शेख, मुख्याध्यापक मंगेश झिने, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक महेंद्र हिंगे, निमगाव वाघाचे ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, दिलीप बोठे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाचारणे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, अक्षय चव्हाण, गोरक्षनाथ कराळे, विजय साळवे, बाळासाहेब साबळे, ओमकार साबळे, निरंजन नरसाळे, सिध्दांत जाधव, रोहन टिमकरे, सोमनाथ तांबे आदी उपस्थित होते.  डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे म्हणाले की, स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून, स्वतःच्या घरापासून करण्याची गरज आहे. सार्वजनिक स्वच्छतेने सुदृढ व निरोगी आयुष्य जगता येणार आहे. ग्रामस्थांनी सार्वजनिक स्वच्छता कर्तव्य म्हणून पाळण्यासाठी पुढाकार घेण्याचे त्यांनी आवाहन केले. युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment