नेवाशाचे पो.नि.विजय करे यांची तडकाफडकी बदली. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 13, 2021

नेवाशाचे पो.नि.विजय करे यांची तडकाफडकी बदली.

 नेवाशाचे पो.नि.विजय करे यांची तडकाफडकी बदली.

व्हायरल झालेल्या क्लिपमुळे बदली झाल्याची तालुक्यात चर्चा?

नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः  पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय करे यांची आज तडकाफडकी अहमदनगर कंट्रोल विभागात बदली करण्यात आली आहे .काल नेवासा शहरात व तालुक्यात अवैध व्यवसायिका समवेत सांभाषणाच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपचा संदर्भ या बदली मागे असल्याची शंका नाकारता येत नाही .आज पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी काढलेल्या आदेशानुसार ही बदली करण्यात आली असल्याची माहिती प्राप्त होत आहे.सध्या नेवासा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी म्हणून सहा.पो.नि.विजय ठाकूर यांना पदभार देण्यात आला आहे.
दरम्यान ऑक्टोबर महिन्यात नेवासा पोलीस स्टेशनचा कॉन्स्टेबल  गर्जे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर दत्ताराम राठोड यांच्यात सेटिंग बाबतची  ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर नेवासा तालुका व पोलीसामध्ये खळबळ उडाली होती
या प्रकरणामुळे राठोड यांची तडकाफडकी बदली झाली विशेष पथकातील आठ कर्मचारीचे वर निलंबनाची कारवाई झाली आणि त्या नंतर 24तासांनी गर्जे यांचेवर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली विशेष म्हणजे नेवासाचे पोलीस निरीक्षक डेरे यांची त्याआधीच मुख्यालयाला बदली झाली होती नेवासा तालुक्यात अवैध व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर कारवाया झाल्या त्यात वाळू, सुगंधी सुपारी घुटका ,गावठी दारू, मटका, रेशनच्या धान्याचा काळा बाजार ,मोटार सायकल चोरी  विविध अवैध व्यवसाय चालू असल्याचे स्पष्ट झाले आहे पण सर्व काही चालू असल्याचे या  दोन ऑडिओ क्लिप मधून जगासमोर आले आहे  अधिकारी बदलले तरी नेवासात अवैध व्यावसायिकांचेच राज्य असल्याचे पुढे आले आहे.

No comments:

Post a Comment