दरवाजा उघडल्यावर मारहाण करणारे सराईत चोर गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 31, 2021

दरवाजा उघडल्यावर मारहाण करणारे सराईत चोर गजाआड.

 दरवाजा उघडल्यावर मारहाण करणारे सराईत चोर गजाआड.

रात्रीचा दरवाजा वाजला.. नागरिकांनो सावधान.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः रात्री-अपरात्री घराचा दरवाजा वाजवून दरवाजा उघडल्यानंतर नागरिकांना मारहाण करून बळजबरी लूटमार करणार्‍या 5 सराईत गुन्हेगारां पैकी 2 गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड करून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल असा 39,000/रु. किमतीचा ऐवज चोरणार्‍या त्यांचे अन्य 3 साथीदारांना गजाआड करण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत.
सदर घटनेची हकीकत अशी की, दिनांक 08 ऑगस्ट रोजी चे रात्री फिर्यादी दिलीप संभाजी पवार (वय - 38 वर्षे रा.भगुर ता शेवगाव) हे त्यांच्या कुटुंबासह घरामध्ये झोपलेले असताना कुणीतरी अज्ञात आरोपींनी त्याचे घराचा दरवाजा वाजविला त्यावेळी फिर्यादी यांनी घराचा दरवाजा उघडला असता. आरोपींनी घरामध्ये प्रवेश करून फिर्यादी व फिर्यादीचे आईस लोखंडी गजाने मारहाण करून सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल असा 39,000/रु.कि.चा एैवज बळजबरीने चोरून नेला होता. या घटनेबाबत शेवगाव पोस्टे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस अधीक्षक अहमदनगर यांच्या सूचनेनुसार अनील कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचे पथक समांतर तपास करीत असताना आणि अनील कटके यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की हा गुन्हा हा घार्‍या उर्फ शिवम काळे रा.साकेगाव ता पाथर्डी याने व त्याच्या साथीदारांनी मिळून केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सोमनाथ दिवटे, गणेश इंगळे, दत्तात्रय हिंगडे, सुनील चव्हाण, मनोहर गोसावी, दीपक शिंदे, शंकर चौधरी, सागर ससाणे, रंजीत जाधव, सागर सुलाने, रोहित येमूल, उमाकांत गावडे यांनी मिळून पाथर्डी येथे जाऊन आरोपीचे ठावठिकाणा बाबत गोपनीय माहिती घेऊन आरोपी अनिकेत उर्फ घार्‍या उर्फ शिवम वैभव काळे (वय 20 वर्ष रा.साकेगाव ता पाथर्डी) यास साकेगाव परिसरातून पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यास विश्वासात घेवून कसून चौकशी केली असता त्याने हा गुन्हा त्याने व त्याचे इतर चार साथीदारांना मिळून केला असल्याची माहिती दिल्याने माहितीच्या आधारे आरोपीतांचा शोध घेऊन आरोपी सेशन उर्फ रोशन उर्फ सेशा रायभान भोसले (वय 30 वर्ष साकेगाव ता पाथर्डी) यास ताब्यात घेतले उर्वरित तीन साथीदारांचा शोध घेतला परंतु ते मिळून आले नाहीत.
ताब्यात घेतलेल्या वरील नमूद दोन आरोपींकडून गुन्ह्यातील चोरलेल्या उद्येमालापैकी 7,000/रु.कि.चा विवो कंपनीचा मोबाईल जप्त करून आरोपींना मुद्देमालासह शेवगाव पोस्टे येथे हजर करण्यात आले असून पुढील कार्यवाही शेवगाव पोस्टे करीत आहेत. आरोपी अनिकेत उर्फ घार्‍या उर्फ शिवम वैभव काळे यांचे विरुद्ध - पैठण पोस्टे औरंगाबाद व रहिमतपूर पोस्टे सातारा येथे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई मनोज पाटील पोलीस अधिक्षक, अहमदनगर सौरभ कुमार अग्रवाल अपर पोलिस अधिक्षक, अहमदनगर सुदर्शन मुंढे, उपविभागीय पोलिस अधिकारी शेवगाव विभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment