रात्रभर संततधार, अनेक गावांना पाण्याचा वेढा, नद्यांना पूर, पिकांचे नुकसान. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 31, 2021

रात्रभर संततधार, अनेक गावांना पाण्याचा वेढा, नद्यांना पूर, पिकांचे नुकसान.

 नगर-कल्याण मार्गावरील वाहतूक बंद.

कोसळधार ! पावसानं झोडपलं...
सीनेला पूर..

रात्रभर संततधार, अनेक गावांना पाण्याचा वेढा, नद्यांना पूर, पिकांचे नुकसान.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जिल्ह्याच्या दक्षिण भागात सोमवार सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस रात्रभर सुरूच होता. आजही पावसाची संततधार सुरुच आहे. जोरदार पावसाने जिल्ह्यातील अनेक गावांना पाण्याने वेढा दिला असून नद्या-नाल्यांना पूर आला आहे. नगर शहरासह जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले असून काल सायंकाळी सुरू झालेल्या पावसाने उसंत न घेता मुसळधार पाऊस सुरूच आहे. रात्रीपासून नगर शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. सीनानदीला पुरपरिस्थिती असून नगर-कल्याण महामार्ग, नालेगांव -लांडेथळ रस्ता, सावेडी-बोल्हेगांव रस्ता पुराच्या पाण्यामुळे वाहतुकीला बंद झाला आहे. नगर शहरातील रस्तेही झाले जलमय झाले असून सखलभाग असलेल्या नालेगांव परिसरातील काही नागरिकांच्या घरात पाणी घुसले आहे.
सोमवारी सायंकाळपासून विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. नगर शहरासह तालुका, श्रीगोदा, पाथर्डी, पारनेर, शेवगाव, जामखेड तालुक्यात पावसाने हजेरी लावली. ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट सुरू होता. रात्रभर झालेल्या पावसाने सीना नदीला पूर आला आहे. नगरमध्ये कल्याण रोडवरील व जेऊर जवळ औरंगाबादरोडवरील वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती. पावसाने अनेक घरातही पाणी शिरले. पाथर्डी व शेवगाव तालुक्यात रात्रभर मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान, तालुक्याच्या पूर्व भागात मुसळधार पावसाने नदीकाठची अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाण्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नगर तालुक्यातील जेऊर गावची मुख्य बाजारपेठ संपुर्ण पाण्यात गेली आहे. लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. .नगर औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक बंद झाली होती. सिना व खारोळी नदिला महापुर आला असून आजपर्यंत चा सर्वात मोठा पुर असल्याचे नागरिक सांगत आहेत. नदी, नाले, बंधारे, तलाव तुडुंब होण्याची पहिलीच वेळ होती. पिंपळगाव तलावात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. चापेवाडी, ससेवाडी, तोडमल वाडी, शेटे वस्ती संपर्क तुटला होता. तिसगाव गर्भगिरी त रात्रभर सलग दहा तास पाऊस झाला. नद्यांना यावर्षी चा पहिलाच पुर आला.अजूनही जोर सुरूच आहे.नदी किनारीच्या घरांचे पायथ्याला पुराचे पाणी टेकले आहे.
नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई आणि परिसरात जोरदार पावसाची नोंद झाली असून धनगरवाडी आणि परिसरातील कांदे, मूग, बाजरी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू असल्याने शेतकरी वर्गात कही खुशी कही गम अशी परिस्थिती आहे. पावसाचे प्रमाण एवढे आहे की पिंपळगाव माळवी तलाव याच पावसात शंभर टक्के क्षमतेने भरू शकतो, अशी शक्यता आहे. बाजरी पिकांसाठी पावसाची प्रतीक्षा होतीच. पण मूग आणि कांदा हे हाताला आलेली पिके या पावसामुळे नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही
बाजरी पीकांसाठी पावसाची प्रतीक्षा होतीच पण मूग आणि कांदा हे हाताला आलेली पिके या पावसामुळे नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जिल्ह्यातील धरणं पाण्यानं भरू लागली आहेत. तसेच नद्यांच्या पाणीपातळीतही मोठी वाढ झाली आहे. रस्त्यावरील कार पाण्याखाली बुडाल्या आहेत. चाळीसगाव- अहमदनगर हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. ज्यात पावसाचा जोर वाढलाय. मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी सोमवारी (30 ऑगस्ट) रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. मुंबईत तर सकाळपासून जोरदार सरी कोसळत आहेत. भारतीय हवामान विभागाने (खचऊ) पुढील 3-4 दिवस राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. काही ठिकाणी तर अतीमुसळधार पाऊसही पडू शकतो, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. या पावसाने औरंगाबादमध्ये पाझर तलाव फुटल्याची घटना घडलीय मुंबई हवामान विभागाने सॅटेलाईट आणि रडार इमेजेसच्या आधारे महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. पुणे, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी आणि बीडमध्ये पुढील 3-4 तास पावसाचा जोर अधिक असेल असंही नमूद करण्यात आलंय. पालघर, रायगड, ठाणे या कोकणातील भागात विजेचा कडकडाट आणि वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment