फरार मोक्का आरोपी जेरबंद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 3, 2021

फरार मोक्का आरोपी जेरबंद.

फरार मोक्का आरोपी जेरबंद.

स्थानिक गुन्हें शाखेची कारवाई.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सोलापूर रोडवरील छावणी परिषदेच्या टोलनाक्यावरील चोरी प्रकरणातील लॉरेन्स स्वामीच्या टोळीतील एका फरार आरोपी बाळासाहेब ऊर्फ बाळा रमेश भिंगारदिवे (रा.आगडगाव ता जि अहमदनगर) हा फरार आरोपी पाथर्डीतील दुर्गा मंदिराजवळ असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन कॅम्प पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी
विविध गुन्हेगारांची माहिती संकलित करून ज्या संघटित गुन्हेगारी टोळ्या आहेत त्यांचे विरुद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत त्यानुसार पोलिस प्रशासन फरार गुन्हेगारांचा शोध घेत आहे. कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये 20 नोव्हेंबर 2020ला छावणी परिषद अहमदनगर सोलापुर रोड येथे घडलेल्या गुन्ह्यातील आरोपी नामे प्रकाश दशरथ भिंगारदिवे (वय 30 वर्ष टोळीप्रमुख रा.निंबोडी वेशीजवळ अहमदनगर) संदीप शरद शिंदे (वय 25 वर्ष राभोसले आखाडा बुरुडगांव रोड भगवत चाळसमोर) विक्रम आनंदा गायकवाड (फरार रा. वाळुंज) बाबा उर्फ भाऊसाहेब सोपान आढाव (रा वाळुंज) संदीप परशुराम वाघचौरे (वय 30 वर्ष रा.दरेवाडी) अर्जुन संभाजी ठुबे (रा खन्ना धाब्याया शेजारी दरेवाडी) बाळासाहेब ऊर्फ बाळा रमेश भिंगारदिवे (रा.आगडगाव) लॉरेन्स दोराई स्वामी (रा.बंगला नंबर 1 सैनिक नगर प्रियदर्शनी शाळे जवळ नगर पाथर्डी रोड) हे सर्वजण अहमदनगर मधील यांनी संघटित टोळी करून सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने व त्यांची एक टोळी असून ते आर्थिक फायद्यासाठी गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाल्याने या या गुन्हास विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांचे परवानगीने गुन्हास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम मोक्काअंतर्गत 1999 चे कलम 3(1) 3(2) व 3(4) प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आले गुन्हा केल्यापासून गुन्ह्यातील आरोपी बाळासाहेब ऊर्फ बाळा रमेश भिंगारदिवे रा.आगडगाव ता जि अहमदनगर हा फरार झाला होता.

गुन्हातील पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेत असताना कॅम्प पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन यांना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम मोक्काअंतर्गत गुन्हातील फरार आरोपी बाळासाहेब ऊर्फ बाळा रमेश भिंगारदिवे रा.आगडगाव ता जि अहमदनगर ता शिराळा ता पाथर्डी जि अहमदनगर येथील दर्गा देवी मंदिराजवळ असल्याची माहिती पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना मिळाल्याने लागलीच वरिष्ठांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे इंगळे साहेब, मनोज शेजवळ, भाऊसाहेब कुरूंद, संदीप घोडके, सुरेश माळी, संतोष लोंढे, जालिंदर माने, चंद्रकांत कुसळकर यांनी शिताफीने गुन्ह्यातील आरोपी बाळासाहेब ऊर्फ बाळा रमेश भिंगारदिवे रा.आगडगाव ता जि अहमदनगर यास ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सपोनि कॅम्प पोलीस स्टेशन यांच्याकडे देण्यात आलेली आहे.
गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणार्‍या टोळी विरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करण्यात येत असून अशाप्रकारे अहमदनगर जिल्ह्यातील गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणार्‍या टोळी विरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करणार असल्याचे संकेत महा पोलीस अधीक्षक मनोज पाटील साहेब यांनी दिलेले आहेत.

No comments:

Post a Comment