सावेडी तलाठी, कार्यालयात होतेय.. नागरिकांची अडवणूक. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 3, 2021

सावेडी तलाठी, कार्यालयात होतेय.. नागरिकांची अडवणूक.

सावेडी तलाठी, कार्यालयात होतेय.. नागरिकांची अडवणूक.

पतसंस्था फेडरेशन चेअरमन वसंत लोढांचे ठिय्या आंदोलन.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः करोनाचे दिवस असले तरी सावेडीच्या तलाठी कार्यालयात नागरिकांची गर्दी होत असून कोणतेही नियम पाळले जात नाहीये. सावेडीच्या तलाठी कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांना आपल्या कामांसाठी महिनोंमहिने चकरा माराव्या लागत आहेत. शहरातील पतसंस्थांना101 कारवाईची दाखले मिळाल्यानंतरही थकीत कर्जदारांच्या मालमत्तेवर बोजा चढवण्यासाठी तलाठी कार्यालयातून वर्षानुवर्ष विलंब होत आहे. पतसंस्थांच्या कर्मचार्‍यांनी वारंवार मागणी व पाठपुरावा करूनही सावेडीच्या तलाठी कार्यालयातून प्रतिसाद मिळत नाहीये. त्यामुळे थकबाकी कर्जदारांवर जप्तीच्या कारवाईस विलंब होत असल्याने पतसंस्थेच्या कामात अडथळा येत असल्याच्या निषेधार्थ नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशनचे चेअरमन वसंत लोढा यांनी सावेडी तलाठी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. तलाठी हरीश्चंद्र देशपांडे यांना धारेवर धरत जाब विचारला.
यावेळी तलाठी देशपांडे यांनी तातडीने या आंदोलनाची दखल घेत पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे प्रलंबित कामे पूर्ण करत फेरफार उतारे दिले. तसेच सर्व पतसंस्थांना पूर्ण सहकार्य करून सर्वसामान्य नागीकांचीही कामे कमीतकमी कालावधीत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
शहरातील पतसंस्थांना थकबाकीदार कर्जदाराच्या मालमत्तेवर बोजा चढवण्यासाठी नगर मधील तलाठी कार्यालयांमधून वर्षानुवर विलंब होत असून सर्वसामान्य नागरिकांना आपल्या कामांसाठीही महिनोंमहिने चकरा माराव्या लागत असल्याचेही ते म्हणाले.
पंडित दीनदयाळ पतसंस्थेचेही मोठ्या संख्येने कामे प्रलंबित आहेत. नगरीकांना होणारा मनस्ताप कमी व्हावा व सर्व पतसंस्थांचेही कामे त्वरित व्हावेत यासाठी सावेडीचे मंजूर झालेले दुसरे तलाठी कार्यालय लवकरात लवकर सुरु व्हावे यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना भेटणार असल्याचे लोढा यांनी यावेळी सांगितले. तलाठी हरीश्चंद्र देशपांडे यांनी यावेळी खुलासा करत सांगितले की, सावेडी तलाठी कार्यालावर क्षमतेपेक्षा शेकडो पटीने कामाचा बोजा आहे. कार्माचारींच्या कमतरते मुळे नागरिकांना तत्पर सेवा मिळत नाहीये. सावेडी भागात दोन तलाठी कार्यालय मंजूर झाली आहेत मात्र अद्याप कार्यान्वित न झाल्याने या कार्यालयावर खूप मोठा ताण आहे. त्यामुळे नागरिकांच्या कामांना विलंब होत आहे.

No comments:

Post a Comment