बागरोजा हडको येथील ऐतिहासिक वास्तूंची साफसफाई सामाजिक समता विचारधारा फौंडेशनवतीने स्वतंत्र दिनानिमित्त - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 13, 2021

बागरोजा हडको येथील ऐतिहासिक वास्तूंची साफसफाई सामाजिक समता विचारधारा फौंडेशनवतीने स्वतंत्र दिनानिमित्त

 बागरोजा हडको येथील ऐतिहासिक वास्तूंची साफसफाई सामाजिक समता विचारधारा फौंडेशनवतीने स्वतंत्र दिनानिमित्त


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
सामाजिक समता विचारधारा फौंडेशनच्यावतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बागरोजा येथील अहमदनगर शहराचे संस्थापक असलेले अहमद निजाम शाह  यांचा मकबरा असलेल्या परिसराची साफसफाई करण्यात आली. याप्रसंगी अध्यक्ष सुनिल मुरलीधर भोसले, सामाजिक कार्यकर्ते सुनिल सकट, मुरलीधर भोसले, सौ.सावित्रीबाई भोसले, श्रेया घोरपडे, सुहानी भोसले आदिंसह फौंडेशनचे कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी झाले होते.
फौंडेशनच्यावतीने बागरोजा हाडको येथील ऐतिहासिक वास्तूची साफसफाई करण्यात आले. यावेळी दर्गाहाच्या आजुबाजुचे गवत काढून परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच  या ठिकाणी असलेल्या वास्तूची बर्याच ठिकाणी पडझड झाली होती. त्या ठिकाणी थोडी डागडुजी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी झाडू , फावडे, घमेले घेऊन परिसर स्वच्छ केला. त्यानंतर सुनिल सकट यांनी या वास्तूच्या ऐतिहासिक महत्व सांगितले. याप्रसंगी सुनिल भोसले म्हणाले, अहमदनगर शहर हे ऐतिहासिक असून शहरात अनेक जुन्या वास्तू असून  अहमदनगर शहराचे संस्थापक असलेले अहमद निजाम शाह  यांचा मकबरा असलेल्या बागरोजा येथे आहे. शेकडो वर्षे इतिहास याची साक्ष देत आजही उभी आहे. या वास्तूचं संवर्धन, संरक्षण, झाले पाहिजे. यापुढील पिढीला आपल्या शहराची ओळख व्हायला हवी. यासाठी ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आजकाल सुट्टीत नागरिक एखाद्या पिकनिक स्पॉट वर फिरायला जातात. परंतु काही समाज कंटक ऐतिहासिक व निसर्गरम्य परिसरात अस्वच्छता निर्माण करून विद्रुपीकरण करतात. ऐतिहासिक वास्तूंवर प्रेमिकांच्या नावं कोरणे, आसपासच्या परिसरात अस्वच्छता निर्माण करणे रिकाम्या दारूच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या, पत्रावळी,कॅरिबॅग आदी नष्ट न होणारा कचरा अस्ताव्यस्त पसरलेले असते, त्यामुळे परिसरात अस्वच्छता दुर्गंधी पसरली जाते. तरी सामाजिक समता विचारधारा फौंडेशन तर्फे आवाहन करण्यात येत आहे. ऐतिहासिक वास्तू ची हेळसांड करु नये परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन केले.अहमदनगर शहराचे संस्थापक असलेले अहमद निजाम शाह  यांचा मकबरा याकडे पुरातन खाते व प्रशासनानचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या परिसराचा विकास होत नाही, ही दुर्दैवी बाब आहे. इतिहासप्रेमी व सामाजिक संस्थांनी या विषयी सक्रीय सहभाग देऊन आवाज उठविला पाहिजे, असेही श्री. भोसले यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment