रात्री 10 वाजेपर्यत छोट्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांनाही परवानगी द्यावी : दामोदर बठेजा
अहमदनगर ः शहरातील सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावरील हातगाड्यावर मिळणारे खाद्यपदार्थ परवडत असल्याने या हातगाडी चालकांही रेस्टॉरंट व हॉटेल प्रमाणे रात्री 10 वाजे पर्यत खाद्यपदार्थ विक्रीची परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपाचे माजी नगरसेवक दामोदर बठेजा यांनी जिल्हाप्रशासनाकडे केली आहे.दामोदर बठेजा यांनी काढलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, शहरात छोट्या हातगाड्यांवर मिळणारे खाद्यपदार्थ, तसेच शहरातील सर्व चौपाटी वरील गाड्यांवर मिळणारे सर्वप्रकारचे खाद्यपदार्थ अत्यंत माफक दारात मिळत असल्याने सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठा आधार आहे. मात्र करोनामळे चालू असलेल्या निर्बंधांमुळे सर्व खाद्यपदार्थांच्या हातगाड्या दुपारी चार वाजल्या नंतर बंद कराव्या लागतात. सर्वसामान्य कुटुंबातील नागरिक, कष्टकरी, कामगार हे आपापल्या कामाच्या ठिकाणाहून चार वाजल्या नंतर सुटत असल्याने त्यांना कमी दारात मिळणार्या हातगाड्यांवरील खाद्यपदार्थ घेता येत नाहीये. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने रस्त्यांवरील सर्व हातगाड्या विक्रेत्यांनाही रेस्टॉरंट व हॉटेल प्रमाणे रात्री 10 वाजे पर्यत विक्रीची परवानगी द्यावी. त्याच बरोबर शहरातील सर्व मिठाई विक्रेत्यांनाही निर्बंधांमधून सुट द्यावी जेणे करुण सर्वसामान्य नागरिक या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याबरोबरच आपल्या मुलांसाठी खाऊ घरी घेवून जाऊ शकतील.
No comments:
Post a Comment