प्राचार्य व लिपिकाने मागितली दीड लाखांची लाच, गुन्हा दाखल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 13, 2021

प्राचार्य व लिपिकाने मागितली दीड लाखांची लाच, गुन्हा दाखल.

 प्राचार्य व लिपिकाने मागितली दीड लाखांची लाच, गुन्हा दाखल.

वडाळा महादेव येथील होमीओपॅथिक मेडिकल कॉलेज मधील घटना.


श्रीरामपूर ः
बी.एच.एम.एस पदवीचे पासिंग सर्टिफिकेट व इंटरशिप पुर्ण केल्याबाबतचे सर्टिफिकेट देणे करिता यातील आरोपी बापुसाहेब बाळासाहेब हरिश्चंद्रे (वय 52 वर्ष, धंदा नौकरी, प्रभारी प्राचार्य, होमिओपॅथी मेडीकल कॉलेज, वडाळा महादेव, ता.श्रीरामपूर. रा.मानूर, ता.राहुरी, जिल्हा अहमदनगर, वर्ग 1 लोकसेवक)  यांनी तक्रारदार व त्यांच्या मुलीकडे  1 लाख 47 हजार 500 रुपयांची मागणी केली. यासंदर्भात लाचलुचपत विभागात तक्रार आल्यानंतर ट्रॅप लावण्यात आला. मुलीचे बी. एच.एम.एस पदवी प्रमाणपत्र देण्याकरीता एक  लाख 47 हजार 500 रुपयांची लाच घेताना होमीओपँथी मेडीकल काँलेज वडाळा येथील प्रभारी प्राचार्य व लिपीका विरुध्द लाचलुचपत विभागाने कारवाई केली.
यानंतर तक्रारदार यांनी लाच प्रतिबंधक विभागाकडे दि.10ऑगस्ट 2021 रोजी दिलेल्या तक्रारीवरून काल रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणीमध्ये आरोपी बापुसाहेब बाळासाहेब हरिश्चंद्रे  यांनी तक्रारदार व त्यांची मुलगी यांचे कडे बी.एच.एम.एस पदवीचे पासिंग सर्टिफिकेट व इंटरशिप पुर्ण केलेल्या कालावधीच्या हजेरीची अ‍ॅडजस्टमेंट करुन सर्टिफिकेट देणे करिता. होमिओपॅथी मेडीकल कॉलेज वडाळा महादेव येथे पंचासमक्ष 1 लाख 47 हजार 500 रुपयांची मागणी केली. त्यानंतर आयोजित सापळा कारवाई दरम्यान सदर लाचेची रक्कम आरोपी बापुसाहेब बाळासाहेब हरिश्चंद्रे ( वय 52 वर्ष, धंदा - नौकरी, प्रभारी प्राचार्य, होमिओपॅथी मेडीकल कॉलेज, वडाळा महादेव, ता- श्रीरामपूर. रा. मानूर, ता.राहुरी, जिल्हा. अहमदनगर) यांचे सांगणे वरुन आरोपी भारती बापुसाहेब इथापे, (वय 34, धंदा- नौकरी, लिपीक, होमिओपॅथी मेडीकल कॉलेज, वडाळा महादेव, ता.श्रीरामपूर, जिल्हा- अहमदनगर) लोकसेवीका यांनी पंचासमक्ष स्विकारली असता दोन्ही आरोपी यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
यानंतर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. ही कारवाई पोलीस अधिक्षक सुनील कडासने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाम पवरे, पोलीस उपअधिक्षक हरिष खेडकर,  पोलीस निरीक्षक दिपक करांडे , हवालदार संतोष शिंदे, रमेश चौधरी, रविंद्र निमसे, वैभव पांढरे, संध्या म्हस्के, हारुन शेख, राहुल डोळसे यांनी सापळा यशस्वी पार पाडला.

No comments:

Post a Comment