भ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 20, 2021

भ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके

 भ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी पारनेर तहसीलदारांचा केविलवाणा प्रयत्नः आ. निलेश लंके
नगरी दवंडी

. पारनेर : दोन दिवसांपासून तहसीलदार ज्योती देवरे यांची जी ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे  तो त्यांचा भ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी केलेला  केविलवाणा प्रयत्न आहे. आठ दिवसांपूर्वी त्यांच्यावर काही गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झालेले आहेत. तसा अहवालही नाशिकच्या विभागीय आयुक्तांनी मुंबईला पाठवला आहे. याअगोदर त्यांनी बरेच अशा स्वरूपाचे प्रकार  केले आहेत. माझ्यासमोर त्यांच्या भ्रष्टाचाराच्या गोष्टी आल्या त्यावेळी व्यक्तिगतरीत्या त्यांना सूचित केल्यावर त्यांनी रात्री-अपरात्री मेसेज करून आत्महत्येची धमकी दिली होती. आतापर्यंत असे बरेच प्रकार झालेले आहेत. असा खुलासा राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी केला आहे

तहसीलदार देवरे ज्या विभागात काम करतात, त्या विभागातील अधिकाऱ्यांनाही त्या दोषी धरतात.निवासी उपजिल्हाधिकारी व प्रांताधिकारी आणि इतर अधिकारी या सर्वांना त्या दोषी धरतात. आपण स्वतः साधुसंत असल्यासारखे काम करतो व इतर  सर्व चुकीचे काम करतात असे भासवण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झालेले आहेत. त्याची सखोल चौकशी चालू आहे. आपला बचाव करण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे, असेही आमदार लंके यांनी म्हटलेले आहे.

No comments:

Post a Comment