राजीव गांधी जयंती निमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 20, 2021

राजीव गांधी जयंती निमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन

 राजीव गांधी जयंती निमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या आठवणींना उजाळा देत अभिवादन सभेचा कार्यक्रम पार पडला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे होते.
यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले की, स्व. राजीव गांधी यांनी देशामध्ये तंत्रज्ञानाचे युग आणले. देशामधील तरुणांना अधिक सक्षम करण्याचे काम केले. देशातील लोकशाही बळकटीकरण तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रगतीमध्ये राजीव गांधींचे अतुलनीय योगदान आहे. आजचा आधुनिक भारत आणि तंत्रज्ञानातील झालेल्या क्रांतीची मुहूर्तमेढ राजीवजी यांनी रोवली होती हे विसरून चालणार नाही. राजीवजींचे विचार काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम केले पाहिजे, असे आवाहन यावेळी काळे यांनी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, अनिस चुडीवाला, प्रवीण गीते आदींची भाषणे झाली. यावेळी ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष निजाम जहागीरदार, इम्रानभाई बागवान, महिला सेवादल काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कौसर खान महिला काँग्रेसच्या उषाताई भगत, माजी नगरसेविका जरीना पठाण, कमलताई ढगे, संगीता पीसोटे, शहर जिल्हा सचिव गणेश खापरे, राहुल गांधी विचार मंचाचे शहर अध्यक्ष सागर ईरमल, नईमभाई शेख आदी या वेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment